Home महाराष्ट्र “विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या...

“विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल मदन लाठी यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून सत्कार”

251

✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जळगाव(दि.22नोव्हेंबर):-गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी सरांनी नियुक्त केलेले ऑयकॉन मदन रामनाथ लाठी यांनी जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या म़तदार संघात प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जळगाव जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी श्री आयुष प़साद यांनी मदन रामनाथ लाठी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ऑयकॉन & पत्रकार बंधु यांचा यांचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यात प्रामुख्याने वादनगरी ग्राम पंचायती ने १००% मतदान करण्याचा निर्धार आणि तास ठराव केला , ती ग्रामपंचायत राज्यात दुसरी आहे , आवर & खेडी खुर्द गावात मतदान जनजागृती केली त्याबरोबर रोज विविध ठिकाणी मतदानाचे महत्व सांगून शपथ देत आहे. त्यात प्रामुख्याने जैन इरिगेशन सिस्टिम लि , जैन फार्म फ्रेश लि मधील विविध,ओरिएंट सिमेंट, नशिराबाद, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , मणियार कॉलेज , आय एम आर कॉलेज, के सि इ इंजिनीरिंग & मॅनॅजमेण्ट कॉलेज , औद्योगिक वसाहतीतील लीग्रँड, सुप्रीम इंडस्ट्रीज , गाडेगाव , माहेश्वरी समाज शहर& तहसील , प्रजापिता ब्रह्माकुमारी सेन्टर ( सोबत रांगोळी द्वारे जनजागृती चे मार्गदर्शन केल्याने .

प्रजापिता सेन्टर ने रांगोळी द्वारे जनजागृती केली) , जळगाव भुसावळ रेल्वे स्टेशन , डा आंबेडकर उद्यानातील हास्य परिवार, हरी ओम ग्रुप रिंग रोड, बहिणाबाई उद्यानातील योग ग्रुप, भाऊंचे उद्यानातील योग ग्रुप, वरिष्ठ नागरिक चैतन्य ग्रुप, माहेश्वरी वरिष्ठ नागरिक, रोटरी मिडटाऊन, जिल्हा न्यायालयातील वकील चेंबर असोसिएशन , जामनेर तालुक्यातील महिला बचत गट , नेरी येथील मोहिनी हॉटेल , सकाळ राजस्थानी समाज , पिंप्राळा रोड वरील भाजी विक्रेता , पेट्रोल पंप, बजरंग बोगद्या जवळील गणेश डेअरी , ज्युस सेन्टर , प्रेसिडेंट हॉटेल मध्ये सप्तरंग न्युज चॅनेल येथे मराठी सिने अभिनेता विजय पाटकर यांचे सोबत , असे विविध ठिकाणी मतदान जनजागृती केलेली आहे

जळगाव जिल्हा मतदारसंघासाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे या साठी जिल्हा प्रशासन विविध प्रकारे जनजागृती करीत असल्याने

जनजागृती सोबत शपथ दिली. या आगळ्यावेगळ्या जनजागृती बदल मदन लाठींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here