Home महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान

राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त विजय लुल्हे यांचे ग्रंथदान

37

▪️वाचाल तर वाचाल !… – विजय लुल्हे [ जळगाव जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ ]

✒️विशेष प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

जळगांव(दि.22नोव्हेंबर):-राष्ट्रीय , सामाजिक , सांस्कृतिक ,वैज्ञानिक मूल्ये रुजविण्यासाठी ग्रंथ अन् ग्रंथालयांचे अमूल्य योगदान अनन्य साधारण आहे. हे लक्षात घेऊन वाचन संस्कृती वर्धिष्णू होण्यासाठी आणि वाचन चळवळ समाजाभिमुख होण्यासाठी निवृत्त प्राथमिक शिक्षक विजय लुल्हे वयाच्या साठीत ध्येयवेडाने झपाटून निरंतर कार्य करीत आहेत.

जळगाव येथील शतकोत्तरी वल्लभदास वालजी वाचनालयास राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह निमित्त तसेच अनंतवासी पूज्य पिताश्री अण्णासो. सुपडू नथु सुतार यांचे स्मरणार्थ आणि सत्यशोधक समाज स्थापनेच्या १५१ वर्षपूर्तीच्या संयुक्त औचित्याने भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगावचे संस्थापक जिल्हाप्रमुख ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांनी बुधवार दि .२० नोव्हेंबर २०२४ रोजी दुर्मिळ ग्रंथदान केले.

ग्रंथदानात विजय लुल्हे यांनी सत्यशोधक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचे चरित्र : राजाराम सुर्यवंशी ,सत्यशोधक दामोदर सावळाराम यंदे :जी.ए.उगले,सावित्रीबाई जोतीबा फुले जीवनकार्य : शांता रानडे ही सत्यशोधकीय अभ्यासपूर्ण पुस्तके ग्रंथपाल अनिल अत्रे यांना वाचनालयासाठी गुरुवार दि.२१ नोव्हेंबर २०२४ रोजी सादर सुपूर्द केले.

याप्रसंगी रोखपाल संजय शिन्दीकर , ग्रंथालय सहाय्यक मोहिनीराज जोशी,सहाय्यक हर्षदा गिरासे , हर्षल अहिरे ,महेश सोनार ,मेघना सोनार आणि सेवक गुलाब मोरे , ज्ञानदेव वाणी ,गिरीष तारे वाचनालयाचे समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते.ग्रंथदानासाठी विजय लुल्हे यांना मातोश्री सिंधु सुतार , सत्यशोधक समाज संघाचे राज्याध्यक्ष अरविंद खैरनार , सचिव डॉ.सुरेश झाल्टे ,विश्वस्त विश्वासराव पाटील,प्रकाशक युवराज माळी,सुवर्णा लुल्हे ,समिक्षा लुल्हे यांनी प्रेरणा दिली.
यापूर्वीही विजय लुल्हे यांनी व.वा.वाचनालयास प्रसंगोपात्त जागतिक पुस्तक दिन ( २३ एप्रिल ) , ग्रंथालय शास्राचे जनक पद्मश्री एस.आर.रंगनाथन यांची जयंती ( ९ ऑगस्ट ) , सत्यशोधक समाज संघ समाज स्थापना दिन ( २४ सप्टेंबर ) निमित्ताने दर्जेदार अभ्यासनीय पुस्तकांचे ग्रंथदान केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here