Home चंद्रपूर मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू- जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केले आदेश...

मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू- जिल्हा निवडणूक अधिका-यांनी केले आदेश निर्गमित चिमूर मतदार संघात झालेल्या मत अधिकाराची टक्केवारी 81.95%

232

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

चंद्रपूर, दि. 21 : येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी निर्गमित केले आहे.

त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परीसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

1. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने /आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील. 2. मतमेाजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून, मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकरी व कर्मचारी यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.

3. भारत निवडणुक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधीत असेल. मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 परीसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल, परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सभोवताल 1 कि.मी.चे क्षेत्रात/ परीसरात ड्रोन वा ड्रोन सदृश्य वस्तु उडविण्यास 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

*या ठिकाणी होणार मतमोजणी :* 70- राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, 73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, 74- चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.
=============

चिमूर विधानसभा-एकूण मतदार 280827 पैकी पुरुष 141153, महिला मतदार 139674 पैकी झालेले मतदान पुरुष मतदार 117144, महिला मतदार 112989 एकूण मतदान 230133 टक्केवारी 81.95%

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here