▪️नवे मतदार युवा युवतींनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी केले पत्रकार संघावतीने आवाहन
✒️किशोर बावणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
साकोली(दि.20नोव्हेंबर):-लोकशाहीचा उत्सव म्हणजे आपले मुलभूत अधिकार मतदान..! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत साकोली विधानसभा मतदारसंघात साकोली गणेश वार्ड बुथवर सकाळी ०७:१९ ला आपले कर्तव्य बजावताना एशियन न्यूज चॅनल संपादक देशोन्नती प्रतिनिधी डि. जी. रंगारी, महाराष्ट्र शासन मा. प्रा. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष दै. युवाराष्ट्र दर्शन प्रतिनिधी आशिष चेडगे आणि पुरोगामी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी किशोर बावणे यांनी नवयुवकांना या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आवाहन केले.