✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.19नोव्हेंबर):- “ नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी “ शब्दगंध च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेमध्ये पाथर्डी येथील सचिन चव्हाण प्रथम,गुहा येथील क्रांती करंजगीकर द्वितीय तर चांदूरबाजार येथील विशाल मोहोळ यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहिर करण्यात येत आहे,” अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
“शब्दगंध च्या वतीने वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कथाकथन,काव्यवाचन,परिसंवाद,चर्चासत्र,कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,दिनदर्शिका प्रकाशन, बालसंस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात.त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते.
कवयित्री शर्मिला गोसावी,स्वाती ठुबे,राजेंद्र फंड यांनी काव्यलेखन स्पर्धा परीक्षक म्हणून
काम पाहिले.निकाल पुढील प्रमाणे…
प्रथम – श्री.सचिन चव्हाण,पाथर्डी
द्वितीय – श्रीमती क्रांती करंजगीकर,गुहा ता.राहुरी
तृतीय – श्री.विशाल मोहोळ,चंदुरबाजार जि.अमरावती
उत्तेजनार्थ – डॉ.राजेंद्र गवळी,कुकाणा,ता.नेवासा
उत्तेजनार्थ – श्रीमती सुजाता रासकर,देवदैठण,ता.श्रीगोंदा
उत्तेजनार्थ – रितेश सरोदे,जि.प.प्रा.शाळा,वहाली ता.आष्टी
स्पर्धेतील प्रथम क्रमांक रु.१,०००/- ,द्वितीय क्रमांक रु ७५१/-,तृतीय क्रमांक रु.५५१/-, उत्तेजनार्थ दोघाना रु.२५१/- स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,पुस्तक भेट असे पारितोषिकांचे स्वरूप राहणार असून प्रायोजक गायकवाड हॉस्पिटल,नगर मनमाड रोड,सावेडी हे आहेत. पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचे मार्गदर्शक ज्ञानदेव पांडूळे,प्राचार्य जी.पी.ढाकणे,अध्यक्ष राजेंद्र उदागे,कार्याध्यक्ष डॉ.अशोक कानडे,कार्यवाह सुभाष सोनवणे,खजिनदार भगवान राऊत, अजयकुमार पवार,शाहिर भारत गाडेकर,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, सुनील धस,डॉ.तुकाराम गोंदकर,बबनराव गिरी,राजेंद्र पवार,रामकिसन माने,किशोर डोंगरे, बंडूशेठ दानापुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे,डॉ.प्रवीण गायकवाड व डॉ.प्रियांका गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.