Home चंद्रपूर वडेट्टीवारांच्या समर्थकांकडून उमेदवार प्रशांत डांगे यांची शिकवणी पत्रिकेतून क्रमांक गहाळ, प्रशांत डांगे...

वडेट्टीवारांच्या समर्थकांकडून उमेदवार प्रशांत डांगे यांची शिकवणी पत्रिकेतून क्रमांक गहाळ, प्रशांत डांगे यांचा बदनामीचा आरोप.

521

 

 

 

रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986

 

ब्रम्हपुरी: रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार प्रशांत चरणदास डांगे यांनी काँग्रेस पक्षाच्या समर्थकांवर गंभीर आरोप केला आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी शिकवणी मतपत्रिकेतून जाणूनबुजून आपला क्रमांक व नाव वगळल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.

प्रशांत डांगे हे ५ व्या क्रमांकावर “जहाज” चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय वडेट्टीवार यांच्या शिकवणी मतपत्रिकेत १ आणि २ क्रमांक कोरे ठेवून थेट वडेट्टीवार यांना ३ क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, ५ क्रमांक सरळ गहाळ करून ६ पासून क्रमवारी पुढे सुरू केली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून, त्यांच्या पक्षाच्या नावाने अपप्रचार केला जात असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे.

डांगे यांच्या मते, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नावावरून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत की, “प्रशांत डांगे काँग्रेससोबत आहेत.” या अफवांमुळे त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर व उमेदवारीवर विपरित परिणाम होत आहे.

प्रकाशक खेमराज तिडके, नितीन गोहने आणि रमाकांत लोधे यांच्या विरोधात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. डांगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी ब्रह्मपुरी व पोलीस निरीक्षकांना लेखी तक्रार देऊन या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. संबंधित प्रकाशकांवर कायदेशीर कारवाई करून, यापुढे असे प्रकार घडू नयेत, याची खबरदारी घेण्याची विनंती केली आहे.

 

*संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण*
या तक्रारीमुळे विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात अधिक चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून या आरोपांवर काय उत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here