✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड /सातारा(दि.13नोव्हेंबर):-अग्रणी सोशल फौंडेशन,विटा जि.सांगली या संस्थेच्या वतीने सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी शैक्षणिक कार्यासोबत, सामाजिक प्रबोधन करणाऱ्या शिक्षकांना सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कार दिला जातो.यावर्षी सदर पुरस्कार माध्यमिक प्रशाला सुलतानगादे ता.खानापूर शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.घाडगे व न्यु इंग्लिश स्कूल धावडवाडी ता.जत येथील क्रिडाशिक्षक ए.बी.शेख यांना जाहीर करण्यात आला आहे.
शिक्षकांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच सामाजिक प्रबोधन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचार वारसा जोपासण्याऱ्या कृतिशील शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक शिक्षकप्रेरणा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो.
यंदा गुरु दि.२८ नोव्हेंबर २०२४ रोजी माध्यमिक प्रशाला बेनापूर – सुलतानगादे ता.खानापूर येथे जेष्ठ साहित्यिक गझलकार मन्सूर जमादार व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राचार्य जे.जी. मुलाणी यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.म.फुले लिखीत ग्रंथ, मानपत्र,शाल, संविधान प्रतिमा, वृक्षारोप व ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.तरी परिसरातील शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अग्रणी संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई लोंढे व पुरस्कार निवड समितीच्या संचालिका कवयित्री नंदाताई खैरमोडे , संघटक हजरत सोनीकर व शकील काझी यांनी केले आहे.