रोशन मदनकर,उपसंपादक , 8888628986
ब्रम्हपुरी:-
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या विधानसभा क्षेत्रांमध्ये ब्रम्हपुरी मतदारसंघ येतो कारण या मतदार संघातून राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडडेटीवार हे कांग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत. मागील दहा वर्षापासून ते या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तर भारतीय जनता पक्षाने क्रिष्णा सहारे या नवख्या उमेदवाराला रिंगणात उतरवले आहे. इतर उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत कांग्रेस व भाजप यांच्यातच होईल, असे बोलले जात आहे.
विजय वडडेटीवार यांच्याकडे तहसील, न्यायालय प्रशासकीय भवन अशा नवीन इमारतींचे बाधकाम आदि सांगण्यासारखे आहे पण शासनाच्या धोरणानुसार जुन्या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचे कार्य महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे म्हणून पूर्वी मंत्री म्हणून व आता विरोधी पक्षनेता म्हणून उल्लेखनीय काय केले? असा सवाल मतदारसंघात विचारला जात आहे. मतदार संघात रस्त्यांचा अनुशेस, पुलांची अर्धवट बांधकामे, नवीन उद्योगधंदे न आणणे, दारूबंदी असतांना मतदार संघातील दारूचा महापूर, त्यांच्याच विशेष प्रयत्नाने उठलेली दारूबंदी व त्यानंतर सुरू झालेले नवीन बार व दारू दुकाने, गोसेखुर्दचे पाणी शेतीला नियमित न मिळणे, बहुजन कल्याण मंत्री असतांना सुद्धा इतर मागास प्रवर्गाकरिता विशेष काही न करणे अश्या मुद्द्यांना धरून प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून प्रचार केला जात आहे. याउलट त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले कृष्णा सहारे यांचा मनमिळावू स्वभाव, स्वच्छ प्रतिमा, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतांना केलेले कामे या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे यावेळेस विजय वडडेटीवार यांना ही निवडणूक जड जाईल असे बोलले जात आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीत कोण बाजी मारेल हे पाहणे रंजक ठरेल.