Home महाराष्ट्र सिद्धनाथ-जोगेश्वरी चा म्हसवडला शाही विवाह सोहळा

सिद्धनाथ-जोगेश्वरी चा म्हसवडला शाही विवाह सोहळा

104

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

म्हसवड, :लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री.सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही मंगल विवाह सोहळा कार्तिक शुध्द द्वादशीस ( तुळशी बारस )बुधवारी( ता.13) मध्यरात्री बारा वाजता पारंपारिक पध्दतीने संपन्न होणार आहे.
या पारंपारिक शाही मंगल विवाह सोहळ्याच्या तयारीची लगीन घाई मंदीराचे पुजारी व मानकरी यांच्यात सुरु झाली आहे.
श्रीच्या विवाह सोहळ्यास प्रत्येक वर्षी सुमारे पन्नास हजाराहून अधिक संख्येने भाविकांची उपस्थिती राहते.
यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराची दर्शन बारी यासह मंदीर परिसर व मंदीरातही स्वच्छता याबरोबरच रंगरंगोटीची कामे सध्या युध्द पातळीवर सुरु आहेत.
या विवाह सोहळ्यानिमित्त मंदीर शिखर व आवारातही आकर्षक रंगबिरंगी विद्युत दिव्याची रोषणाई करण्यात आली आहे.
श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानचा पारंपारिक शाही विवाह सोहळ्याचा प्रारंभ दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीची घटस्थापना,हळदी लावणे व विवाह प्रितर्थ भाऊबिजेस फटाक्याच्या आतषबाजीत दिलाळी मैदान (श्री म्हातारबाबा मंदीरास सालकरी व मानकरी यांच्या भेटीचा कार्यक्रम ) हजारोंच्या संख्येतील भाविक व महिलांच्या उपस्थित मोठ्या थाटात संपन्न झाला.
कार्तिक शुध्द प्रतिपदा दिपावली पाडवा ते मार्गशिर्ष प्रतिपदा देव दिपावली या दरम्यान तब्बल एक महिन्याच्या कालावधीचा श्रीचा शाही विवाह सोहळा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो.
दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीच्या अभ्यंगस्नानानंतर मंदीराच्या मुख्य गाभा-यातील प्रवेशद्वारा नजिकच्या श्री. म्हातारबाबा मुर्तीच्या समोर मंदीराचे सालकरी महेश बुरंगे-गुरव व सालकरीण सौ.शुभांगी गुरव यांच्या हस्ते विविध धान्याचा समावेश असलेले ल्या बिजरोपणाच्या घटस्थानेने करण्यात आला.
यानंतर सकाळी अकरा वाजता मंदिरातील हत्ती मंडपात श्रींच्या पंचधातूंच्या उत्सवमूर्तिंना हजारो महिलांकडून हळदी लावण्याचा समारंभ सनई -चौघडा मंगल सुरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानंतर या विवाहा निमित्त भाऊबिजेस सालकरी,मानकरी व पुजारी गुरव मंडळीसमवेत येथील राजबागेतील श्री म्हातार देव मंदीरात भेटीसाठी “दिवाळी मैदान’ ढोलाच्या निनानादात संपन्न झाले
या विवाह सोहळ्यानिमित्त श्रीची घटस्थापना होताच भाविकांनी नित्य पहाटे सलग बारा दिवसाच्या अनवाणी पायी चालत नगरप्रदक्षणा उपक्रम सुरु ठेवला असुन या उपक्रमाची सांगता याबरोबरच मंदीरातील श्री म्हातारबाबा देवाच्या मुर्ती समोर दिपावली पाडव्यास स्थापित केलेले घट उठविण्यात येणार असुन मंदीराचे गुरव पुजारी व मानकरी व या बरोबरच सर्व जाती -धर्मातील भाविकांनी सलग बारा दिवसाचे दिवस रात्र उभे राहून उपवास आराधना सुरु ठेवलेल्या उपवाहासाची सांगता करण्यात येणार आहे.
श्री.सिध्दनाथ देवी जोगेश्वरी हे जरी हिंदू धर्मिय देवस्थान असले तरीही श्रीच्या 12 दिवसाच्या उपवाहासासह पायी चप्पल न घालता अनवाणी 12 दिवस नगरप्रदक्षणा उपक्रमात यंदाही मुस्लिम धर्मिय बांधवासह इतर सर्व जाती धर्मातील भाविकांनीही सहभाग घेतला असल्याची विशेष बाब या देवस्थानची माणली जात आहे.

या शाही मंगल विवाहाची सांगता देव दिपावलीस (शनिवारी 2 डिसेंबर ) विवाहानंतरची वरात वधू – वराची चार चाकी रथातून नगरप्रदक्षणा मिरवणुकीने केली जाणार आहे.
या रथ यात्रेस प्रत्येक वर्षी सुमारे चार ते पाच लाख भाविकांची उपस्थिती राहते.

—-
अकराव्या शतकातील या पुरातण मंदीरातील सुमारे पाच फूट उंचीच्या काळ्या पाषाण दगडी हत्तीच्या शिल्पास प्रथमच वज्र लेप करुन पोरार्णत्व जपुन आकर्षक असे करण्यात आले आहे या बरोबरच मंदीरातील शिवलिंगासही कुशल कारागिर कडून मंदीर ट्स्टने वज्र लेप करुन त्यामध्ये पुन्हा धार्मिक विधी करुन प्राण प्रतिष्ठा करण्यात आली आहे.

भाविकांसाठी आधुनिक सुलभ शौचालय व स्वच्छतागृह सुविधा
या मंदीरात श्रीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत चालली आहे.याबरोबरच मंदीरातील वर्षभरातील पारंपारिक धार्मिक ऊत्सव व श्रीचा विवाह सोहळा,यात्रा काळातही दर्शनास येणा-या भाविकांना सुलभ शौचालय व स्वच्छताची पुरेशी सुविधा नसल्यामुळे मोठी गैरसोय होत होती.
यामुळे मंदीर ट्रस्टने आधुनिक सर्व सुविधायुक्त असे महिलां व पुरुषा करिता येथील पटेल कन्ट्रक्शन्सचे स्थापत्य अभियंता सद्दाम चोपदार यांच्या संकल्पनेतून सुलभ शौचालय सोबतच स्वच्छतागृह बांधकाम नुकतेच पुर्ण केले असुन भाविकांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here