✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.12नोव्हेंबर):- २३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे सर्वोदय शिक्षण समितीद्वारा संचालित महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड आणि वऱ्हाड विकासाच्या वतीने २६ व २७ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजन केले आहे.परिवर्तनवादी कवी व अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची या २३ व्या राज्यस्तरीय सत्यशोधक महात्मा फुले साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आलेली आहे.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव समाजभूषण प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी बैठकीत मांडला. त्याला श्री साहेबरावजी पाटील, प्राचार्य रवींद्र वासनकर, वसंतराव तडस, पांडुरंग पाटील, वामनराव भडके, मदनलाल शर्मा, प्रकाशराव भोजने, अरविंद आमले, रमेशराव भोजने,मधुकर कवठकर, प्राचार्य श्रीमती एस.एस.दातीर तसेच वृक्ष मित्र व सामाजिक कार्यकर्ते नारायण मेंढे यांनी समर्थन दिले.
महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, कै.मौनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान च्या सचिव श्रीमती ज्योती पदमने,सदस्य श्री भगवान बुंदेले (माजी एपीआय ), श्री गणेश बुंदेले तथा कै.बाबारावजी वायलाजी बुंदेले राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार प्राप्त श्री शरद गढीकर,श्री विनोद इंगळे (अध्यक्ष, सत्यशोधक समाज समिती, अमरावती), गझलकार श्री देविलाल रौराळे विद्रोही कवी श्री प्रवीण कांबळे, श्री देवानंद पाटील तसेच वऱ्हाड विकास, डॉ.आंबेडकर समाज भूषण संघटना, महानायक संघटना, तथागत बुद्ध संघ आणि फुले- शाहू- आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
आजपर्यंत प्रा.अरुण बुंदेले यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,ग्रामीण दलित साहित्य संमेलनापासून तर ऑनलाईन कवी संमेलना पर्यंतच्या अनेक कवी संमेलनातील अध्यक्षपद, प्रमुख अतिथीपद भूषविले असून निमंत्रित कवी म्हणून अनेक समाजप्रबोधनपर परिवर्तनवादी काव्यरचनांचे अभिनयातून सादरीकरण केलेले आहे. ते विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांचे अध्यक्ष, सदस्य असून वऱ्हाड विकास मासिकाचे सहसंपादक आहेत.
अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांची सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयावरील ” निखारा ” व ” अभंग तरंग ” या दोन काव्यसंग्रहासह अकरा पुस्तके प्रकाशित झालेली असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.त्यांची शैक्षणिक प्रबोधन माला विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धीसाठी तर समाजातील विविध समस्यांवर प्रबोधन करणारी सामाजिक प्रबोधन माला व काव्य प्रबोधन माला सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजासमोर ते सादर करतात.
प्रा.अरुण बुंदेले यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्याचा गौरव दोन राष्ट्रीय व २२ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.२३ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी सत्यशोधक कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.