Home महाराष्ट्र भारतात स्री शिक्षण प्रथम सुरू करणारे जनक व ज्ञान देवता म्हणजे फुले...

भारतात स्री शिक्षण प्रथम सुरू करणारे जनक व ज्ञान देवता म्हणजे फुले दाम्पत्य होय – मुख्यमंत्री नायब सिंह सैनी

93

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️महात्मा फुले वाड्यात हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी फुले एज्युकेशन तर्फे सन्मानित

म्हसवड /सातारा(दि.12नोव्हेंबर):- थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय स्मारक समता भूमी या ठिकाणी थोरसमाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास सुरुवातीला हरियाणा मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचे शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

त्यानंतर फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन आणि महात्मा फुले महात्मा फुले चरित्र साधने साहित्य प्रकाशन समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचे वतीने हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नामदार नायब सिंह सैनी यांचे नुकतेच झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर निवड झाली म्हणून आमदार योगेश टिळेकर यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी ,उपरणे आणि सत्यशोधक रघुनाथ ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी हिंदी इंग्रजी आणि जर्मन,सत्यशोधक विवाह मराठी व प्रा.सुकुमार पेटकुले लिखित तेलगू व डॉ.प्रल्हाद वडगांवकर लिखित महात्मा फुले गीत चरित्र सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी भेट दिले तर मच्छिंद्र दरवडे आंनदा कुदळे यांचे शुभहस्ते भव्य पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रतिपादन करताना मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले की फुले दाम्पत्यानी सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात बहुआयामी कार्याची सुरुवात या वाड्यातून करीत शुद्राती शूद्रांना पाण्याची विहीर खुली केली. बाल हत्या प्रतिबंधक गृह सुरू केले तसेच भारतात प्रथम महिलांना शिक्षण सुरू करणारे ते जनक व ज्ञान देवता आहेत.पुढे ते म्हणाले की मला राज्य चालवताना सर्व समावेशक , जनसेवक म्हणून माझे हातून अधिक चांगले कार्य होण्यासाठी आज माझा सन्मान फुले पगडी घालून जो झाला त्यामुळे मला या फुले वाड्यातून एक मोठी ऊर्जा , स्फूर्ती व प्रेरणा मिळाली आहे . आपणास वचन देतो की मी फुले दांपत्यांचा आदर्श विचार घेऊनच काम करणार आहे.

यावेळी सामजिक कार्यकर्ते पी अम सैनी, काळूराम गायकवाड , स्मिता गायकवाड , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे आधी सभा सदस्य राहुल पाखरे, अखिल सैनी समाज महाराष्ट्राचे सचिव संगीता कोल्हे,पुणे अध्यक्ष डॉ.लीना बोरुडे, हनुमंत टिळेकर ,सुधीर पैठणकर,विजय कोठावळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here