▪️…या निवडणुकीत माजोरी नेत्यांचा माज उतरवला पाहिजे. तो मतदानातूनच…!
बातमी पहायला मिळाली. नेता म्हणाले,”साले कुणबी ५०० रूपयात विकले जातात.”
तरीही तुम्ही भाजप ला मतदान करणार का?
आज कुणबीला साले म्हटले.
मग काय दुसरे माळी, साळी, कोळी, तेली यांचे बाबतीत म्हणणार नाहीत का?
येथे कुणबी हा एकमेव घटक जबाबदार नाही, हा नेत्यांचा माज आहे, माज !चोरी करून करून माजलेत हे! चोरांना जात, पात, देव, धर्म काहीच नसतो. ते माजले कि आई बापाचा सुद्धा गळा दाबतात. तुम्ही किस गलीमे गलबला!
आता या निवडणुकीत माजोरी नेत्यांचा माज उतरवला पाहिजे. तो मतदानातूनच!
जळगाव ला सुद्धा असा प्रकार घडला आहे, घडत आहे.
पैशांचा माज आला आहे. खेड्यातील महिलांना रोजंदारीवर आणून रॅली काढली.
हा माज नाही का?
अधिकाऱ्यांना पैसा देऊन रस्त्यावर नंगानाच केला.
हा माज नाही का?
विना परवानगी शहरात रॅली काढली.
हा माज नाही का?
दारू विकून, रेती, राशन चोरून, सट्टा, डान्सबार चालवून पैसा कमवला.
हा माज नाही का?
महिलांना गरज नसतांना कार्यालयात बोलवून साडी, भांडी वाटप केली.
हा माज नाही का?
तरूणांना दारू पाजून शिवजयंती, गणपती, नवरात्री ला नाचवले.
हा माज नाही का?
जर असाच माज वाढत गेला आणि तुम्ही मतदान करून वाढवला तर तुमची बायको पोरी सुरक्षित राहाणारे नाहीत. दारू पाजून व्यसनाधीन केलेली मुले तुमची दुकाने फोडतील. घरासमोरची गाडी मोटार चोरतील.
मग काय, पोलिस आणि न्यायाधीश तुमचा बचाव करतील का?आणि त्यांनाच पैसा दिला तर तुमचा वाली कोण?
कोणीच नाही! तुम्हाला जळगाव सोडून मुंबई, नाशिक, पुणे, बंगलोर पळून जावे लागेल.
आज चगळा. भाजप! कमळ! राम मंदिर! काश्मीर! पाकिस्तान! पण जळगाव चा सत्यानाश झाला तर भाजप, कमळ, राम मंदिर, काश्मीर , पाकिस्तान काय कामाचे?
अहो! अयोध्येतील लोक शहाणे झाले. त्यांनीच लबाडांना ला झिडकारले! तुम्ही जळगाव चे लोक कधी शहाणे होणार?
जर तुम्ही सुरक्षित नसाल तर कमळ घेऊन राम मंदिरात राहाणार का?कसे शक्य आहे?
तुमचा नाश तुम्हीच ओढवून घेत असाल, दारू, रेती माफियांना निवडून देत असाल तर मोदी किंवा फडणवीस किंवा भागवत जळगाव चे रक्षण करायला येतील का?
मी सांगतो, एकदा मोदींना आणि फडणवीसांना किंवा भागवतांना फोन करून खात्री करून घ्या. का हो! जळगाव चे रक्षण करायला तुम्ही येणार का?
त्यांनी जे उत्तर दिले, हो किंवा नाही, ते जाहीर सांगा. येतील कि नाही येतील?
जर ते खरोखरच जळगाव चे रक्षण करायला येणार असतील तर मी सुद्धा दारू विकणारा, रेती चोरणारा, पिस्तूल चालवणारा, कमीशन खाणारा उमेदवाराला मतदान करील. होऊन जाऊ दे, तुमच्या मनासारखे. जळगांवचा सत्यानाश! जसा इराकचा झाला. जसा पाकिस्तानचा झाला. जसा म्यानमारचा झाला.जसा नेपाळचा झाला. जसा लंकेचा झाला. जसा बांगलादेशचा झाला.
म्हणून म्हणतो, आधी मोदी, फडणवीस, भागवत कडून खात्री तर करून घ्या. भारताचा सुद्धा नाश करायचा का? आधी जळगाव पासून सुरूवात करू का?
जळगाव मध्ये बुद्धीमान उच्चशिक्षित ज्ञानी प्रामाणिक माणूस उमेदवार उभा आहे.
“शिवराम पाटील”
तरीही दारू रेती राशन कमीशन चाकू सुरी पिस्तूल वाल्याला मतदान करणार का?
तर मग, घ्या पुन्हा अनुभव!
तुमचे हाती तुमचे जिवन,!
तुमचे हाती तुमचे मरण!
तेथे काय करील राम?
आणि कशाला हवा रावण?
✒️शिवराम पाटील(मो.9270963122)