अत्तादीप धुळे, विशेष प्रतिनिधी मो. 95119 53580
उमरखेड- येत्या २० नोव्हेंबर ला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून निवडणूक गीत, रांगोळी, पथनाट्य, मतदान जागृती संदर्भात चित्रकला स्पर्धा, मानवी साखळी, मॅरॅथॉन, पायी किंवा सायकल रॅली काढून मतदान जनजागृती करावी या संदर्भात वेळापत्रक काढण्यात आले.
त्या निम्मित मतदान जनजागृती विशेष मोहीम पंचायत समिती (उमेद) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान कक्ष उमरखेड यांच्या माध्यमातून बँक सखी प्रियंका धुळे MSRLM यांनी दि. ९ नोव्हें. रोजी दहागाव येथील बुद्ध विहारासमोर मतदान राजा जागा हो लोकशाही चा धागा हो, चला आता वेळ आली आपली जबाबदारी पार पाडन्याची, परिवर्तन घडवून आणण्यासाठी मतदान करा, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा, तुमचे मत उद्याचे भविष्य, मतदान तुमची खरी ताकत ,तुमचे मत तुमचा आवाज,तुमच्या एका मताने फरक पडतो अशा विविध श्लोक लिहून सुंदर अशी रांगोळी काढल्यामुळे गावात सर्वत्र रांगोळीची चर्चा होत आहे.