Home महाराष्ट्र अपर्णाताई किर्तीकुमार भांगडीया यांनी साधला नागरिकांशी संवाद

अपर्णाताई किर्तीकुमार भांगडीया यांनी साधला नागरिकांशी संवाद

186

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.10नोव्हेंबर):- सौ. अपर्णाताई किर्तीकुमार भांगडीया, सौ. संगीताताई मालानी व डॉ. सौ. नेहाताई वैभवजी बियाणी यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटी भांगडीया यांच्या प्रचारार्थ नागभीड तालुक्यातील गोविंदपूर पंचायत समिती क्षेत्रातील वैजापूर, येनोली, सोनापूर व गोविंदपूर या गावांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरा करीत विविध ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

ग्रामस्थांशी संवाद साधताना भाजपा-महायुती सरकारने केलेली अनेक लोकोपयोगी विकासकामे व जनसामान्यांसाठी राबविलेल्या जनकल्याणकारी योजना आणि आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी संपूर्ण चिमूर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कार्याची तथा समाजकार्याची माहिती देत चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून पुन्हा एकदा आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले.

दरम्यान, समस्त ग्रामवासीयांच्या वतीने विविध ठिकाणी सौ. अपर्णाताई किर्तीकुमार भांगडीया, सौ. संगीताताई मालानी व डॉ. सौ. नेहाताई वैभवजी बियाणी यांचे उस्फूर्तपणे औक्षण करीत पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध भाजपा नेते/नेत्या, पदाधिकारी तथा कार्यकर्ते/कार्यकर्त्या आणि स्थानिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here