Home महाराष्ट्र सर्व मतदार व दिव्यांग,ज्येष्ठ मतदार यांनी मतदान करावे – सचिन माने, मुख्य...

सर्व मतदार व दिव्यांग,ज्येष्ठ मतदार यांनी मतदान करावे – सचिन माने, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हसवड नगरपरिषद

12

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100

 

म्हसवड : निवडणूक विभागाकडून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना अडथळा विरहित व सुलभपणे मतदान करता यावे यासाठी केले नियोजन केले असून सर्वांनी मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले

258 माण विधानसभा मतदार संघ अंतर्गत दिव्यांग,संघटना, दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मतदान विषयक जागृती करण्यासाठी म्हसवड नगरपालिका या ठिकाणी बैठकीचे आयोजन केले होते यामध्ये विविध दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सचिन माने साहेब यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले.
श्री हणमंतराव अवघडे यांनी भारत निवडणूक आयोग यांच्या वतीने दिव्यांग व जेष्ठ मतदार यांच्यासाठी ज्या सुविधा दिल्या जातात त्याची सविस्तर माहिती दिली यात रॅम्प ,सहाय्यक ,स्वयंसेवक घरी करावयाचे मतदान, व्हील चेअर, लो व्हीजन साठी भिंग, sign lanuage , वाहन व्यवस्था त्याचबरोबर विविध प्रकारातील दिव्यांग मतदारांसाठी माण विधानसभा मतदारसंघात मा. उज्वला गाडेकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी माण खटाव व जिल्हा नोडल अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा मा. निलेश घुले साहेब, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मा. विकास अहिर साहेब, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मा.बाई माने मॅडम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मा. वैभव लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली माण विधानसभा मतदार संघात केलेल्या तयारी विषयी माहिती दिली. सक्षम ऍपच्या माध्यमातून आलेल्या मागणीचा पाठपुरावा करून सर्व सोयी कशा पुरवल्या जातात याबाबतची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
यानंतर म्हसवड नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सचिन माने आहे यांनी म्हसवड नगर परिषद हद्दीत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मतदान विषयक केलेल्या सुविधांची माहिती दिली.सर्व मतदार यांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सर्व संघटनांनी दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचे मतदान वाढीसाठी जनजागृती करून मतदान वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
यावेळी दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर,बाळासाहेब सरतापे दिव्यांग कक्षाचे सहाय्यक प्रशांत जाधव व अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक मा.सुनील डोंगरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here