Home महाराष्ट्र उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठरा

उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठरा

217

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

▪️राजकारणातील बाजारुपणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने मांडला ऐतिहासिक ठराव..

म्हसवड(दि. 7नोव्हेंबर):- नुकत्याच होऊ घातलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यातील पहिली उमेदवारी इम्तियाज नदाफ यांना माण खटाव मधून जाहीर झाल्यानंतर, जोमाने तयारी लागलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक दहिवडी येथे पार पडली. या बैठकीदरम्यान राजकारणात पैशाचा वापर ही अनैतिक बाब असल्याने अशा पद्धतीच्या राजकारणाचा निषेध व्हावा अशी भावना कार्यकर्त्यांमधून उमटली होती.

त्याचाच परिपाक म्हणून माण खटावच्या जनतेने त्यांचा सांस्कृतिक वारसा, म्हणजेच माण खटावच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या काळामध्ये उमेदवाराचा चहा पिणं हे सुद्धा आम्ही निषिद्ध मानत होतो असा उल्लेख केल्याने तोच संस्कार पुन्हा माण खटावच्या मातीत रुजवण्यासाठी धन दांडग्यांच्या हातातली बटकिन झालेल्या राजकारणाचा श्वासमुक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा या घाणेरड्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ठरावाद्वारे उमेदवाराचा चहा सुद्धा न पिण्याचा ठराव वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.

याद्वारे माण खटाव मतदारसंघातील राजकीय नैतिकतेचा पाठ पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्याचे ठरले आहे. आणि 2024 ची निवडणूक जनतेच्या पैशातूनच जनतेसाठी लढण्याचा चंग वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. ज्याची सुरुवात उद्या होणाऱ्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेच्या अगोदर उमेदवाराच्या निवडणुकीच्या साठी उघडण्यात येणाऱ्या बँक खात्याचा क्यू आर कोड व्हायरल करून जनतेला मदतीचे आव्हान करण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नैतिकतेचा विचार पुन्हा चर्चेत येत असल्याचे पाहून माण खटाव मधील स्वाभिमानी सुसंस्कृत मतदारांमध्ये नक्कीच आशेचा किरण उदयास येईल आणि धन दांडग्यांच्या मुजोरी राजकारणाचा बिमोड होईल. अशी अपेक्षा या बैठकीदरम्यान करण्यात आली. सदर बैठकीस मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज भाई नदाफ यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, माणचे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे, माणचे तालुकाध्यक्ष युवराज भोसले, ज्येष्ठ नेत्या कमलताई म्हस्के, माजी सरपंच, बजरंग वाघमारे युवाचे सनी तुपे आणि रणजीत सरतापे, मसवडचे माजी नगरसेवक अंगुली बनसोडे वडूजचे विद्यमान नगरसेवक तुषार बैले, आंधळी चे ग्रामपंचायत सदस्य अतुल खरात, नजीर आतार, अजीम मुल्ला, जावेद तांबोळी, महेंद्र कांबळे, गौरव भंडारी, निकित खरात, कुलदीप बनसोडे, इत्यादी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here