Home महाराष्ट्र वकीली पेशाला काळीमा,अल्पवयीन मुलीवर केला वकिलाने अत्याचार

वकीली पेशाला काळीमा,अल्पवयीन मुलीवर केला वकिलाने अत्याचार

797

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि. 6नोव्हेंबर):- गंगाखेड येथील
पेशाने वकील असणाऱ्या व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गंगाखेड शहरांमध्ये उघडकीस आली आहे. या नराधमावर पुणे भोसरी पोलीस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे गंगाखेड मध्ये पीडित मुली बद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे .

गंगाखेड शहराच्या नगरात आपल्या मुलीची
परिस्थिती हलाखीची असल्याने आपल्या आजीकडे शिकण्यासाठी असणाऱ्या मुलीवर पेशाने वकील असणाऱ्या राम गायकवाड यांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये मुलीची आजीही शामिल असल्याची फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

पुणे भोसरी पोलिस ठाण्यात दहा वर्षीय मुलीचा आईने दिलेल्या तक्रारीत भोसरी, पुणे येथे वास्तव्यास आसून माझी मोठी मुलगी,वय 10 वर्षे दुसरी मुलगी वय 9 वर्षे हे माझ्या मुळ गावी गंगाखेड येथे माझ्या आईच्या घरी मागील 2 वर्षापासुन राहात आहे.माझे पती संच्युरी एका कंपनीत कामास आहेत घरी आर्थिक अडचणी असल्याने माझ्या मुलींना गंगाखेड येथे माझ्या आईकडे शिकण्यासाठी पाठवलेले आहे. मी आधुन मधुन गावी जावुन माझ्या मुलांची खुशहाली बघत होते. तसेच रोज माझ्या आईच्या फोनवर फोन करून रोज माझ्या मुलींशी
संवाद साधुन त्यांच्याबाबत विचारपुस करीत आसते त्यांच्या शाळेस दिवाळीच्या सु‌ट्टी असल्याने माझ्या दोन्ही मुलीना माझ्यासोबत भोसरी, पुणे येथे आले त्यांची दिवाळीची सुट्टी संपत असल्याने त्यांना परत गंगाखेड येथे पाठवण्याच्या तयारीत होते त्यावेळी माझी मोठी मुलगी हि रडुत गंगाखेड येथे न पाठवण्यासाठी हट्ट करीत होती. त्यावेळी मला वाटले की तिला शाळेत जायचे नाही म्हणुन ती हट्ट करीत असेल.

परंतु मी तिला विश्वासात घेवुन विचारणा करता तिने मला सांगीतले की आज्जी मुक्ताबाई मारुती बोईनवाड घरी राम गायकवाड काका हा रोज येतो मी त्यांना ओळखते ऑगस्ट 2023 एके दिवशी रात्री आठा वाजता सुमारास राम काका घरी आले आई आजी माझ्या जवळ आली व मला तिच्या सोबत बेडरुमध्ये घेवुन गेली. त्यावेळी राम काका तेथे बसलेले होते. त्यानंतर आईआज्जीने मला राम काकाच्या जवळ बसण्यास सांगितले. उलट जाते वेळेस खाउसाठी 20 रुपये देत कोणाला सांगु नको अशी धमकी देत तु कोणाला सांगीतले तर तुला घरा मागच्या शेतात खड्डा करुन पुरुन टाकेन हा प्रकार सातत्याने सुरू होता.

वकील राम गायकवाड याने दि. 24/10/2024 रोजी सुध्दा अत्याचार केल्याचे उघड झाले या प्रकरणी आईचा तक्रारी वरून भोसरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिनं, व कलम- 00/2024, भादवी कलम 376,376(2) (एन), 376 (अब), 354(अ), 109, 114, 506 सह लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधि. 2012 चे कलम 4,6,8,10,17 प्रमामाणे आरोपी राम गायकवाड आईआजी मुक्ताबाई मारोती बोईनवाड विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला सदरील गुन्हा गंगाखेड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आरोपीस गजाआड करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here