Home महाराष्ट्र नव मतदार युवक युवतीनी मतदान करताना उमेदवार हा उच्चशिक्षित सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष,चरित्रशील, पाहुन...

नव मतदार युवक युवतीनी मतदान करताना उमेदवार हा उच्चशिक्षित सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष,चरित्रशील, पाहुन मतदान करावे – मेघना मगर

22

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात व परळी मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दैनिक कांतीकारी साथी जय महाराष्ट्र महिला संघटना व आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेच्या वतीने नवीन नोंदणी झालेले युवा मतदार व इतर मतदारांना साठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना संस्था व संघटनेच्या अध्यक्षा मेघना मगर म्हणाल्या की आज समाजात मतदानाचा बद्दल उदासीनता दिसून येत आहे मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे. पण लोक याच्या कडे *हाॅली डे* म्हणून पाहात आहे हे लोकशाही च्या दृष्टीने घातक आहे. तरी आपण मतदान नक्की करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच नव मतदार युवक युवती नी व सर्वानी मतदान करताना उमेदवार हा उच्चशिक्षित, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, चरित्रशील, पाहुन मतदान करावे असे ही म्हणाल्या. यावेळी या कार्यक्रमाला दैनिक कांतीकारी साथी च्या संपादक सौ वर्षा मगर यांच्या सह जय महाराष्ट्र महिला संघटनेचे सर्व पदाधिकारी आईसाहेब जिजाबाई सेवा संस्थेचे पदाधिकारी हनुमंत मगर, बसवेश्वर खोत, गणेश मगर, अतिष विधाते सुरज काळे शेख गफार, रवी मगर सारिका झाटे पद्मिनी बरिदें व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here