Home महाराष्ट्र बहुचार्चित गंगाखेड विधानसभा मतदार संघात काका, मामा, भाऊ यांच्यात लढत

बहुचार्चित गंगाखेड विधानसभा मतदार संघात काका, मामा, भाऊ यांच्यात लढत

112

✒️अनिल साळवे(परभणी,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.5नोव्हेंबर):- 97 गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2019 प्रमाणे समीकरण असेल की काय? या बाबत तर्क वितर्क काढले जात असून गंगाखेड विधानसभेची लढत महायुतीकडून डॉ.रत्नाकर गुट्टे,महा आघाडीतून विशाल कदम तर वंचित बहुजन आघाडी मधून सिताराम घनदाट तर जनहित लोकशाही पार्टी कडून रबदाडे मामा यांच्या मध्येच होणार असल्याचे दिसते.

महायुती कडून राष्ट्रीय समाज पार्टीचे रत्नाकर गुट्टे, (काका ) महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे विशाल कदम, (भाऊ ) वंचित बहुजन आघाडीचे सिताराम घनदाट (मामा ) जनहित लोकशाही पार्टी कडून रबदाडे (मामा) यांच्यात प्रमुख लढाई होताना दिसते.

महायुती, महाआघाडी व बहुजन वंचित आघाडी उमेदवार लक्ष्मी अस्त्र कोण कसे वापरेल? गाव पातळीवर शेवट पर्यंत कोण मतदार संपर्कात राहील ?प्रचाराची रणधुमाळी कशी असेल ?महायुती आणि महाआघाडीतील सहकारी पुढारी मनाने एकमेकां सोबत असतील का ?असे प्रश्न मतदारास पडू शकतो परंतु गंगाखेड विधानसभा संघातील मतदार मात्र या वेळी नक्कीच चमत्कार घडवतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here