✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.5नोव्हेंबर):- लढणाऱ्या मुलीचं भावविश्व उलगडणाऱ्या तिला फुलू द्या! या बहुचर्चित मराठी लघुपटाचा पहिला प्रीमियर शो रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये क्रियेटिव्ह हेड अॅड. करुणा विमल यांनी दिली.
लघुपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून निर्मिती निर्मिती फिल्म क्लबने केली आहे. दिग्दर्शक अनिल म्हमाने, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, सहनिर्माता विश्वासराव तरटे, सिकंदर तामगाव, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर यांचे तर संकलन राजवीर जाधव यांनी केले असून डी.ओ.पी. म्हणून अश्वजीत तरटे यांनी काम पाहिले आहे.
यावेळी निर्मिती विचारमंच आणि संविधान जनजागृती अभियानाचा या वर्षीचा समता जीवन गौरव पुरस्कार देऊन सांगलीच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व कामगार नेत्या कॉ. सुमन पुजारी आणि गोव्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नेते उमेश गाड यांचा तर आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत तिला फुलवण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कॉ. सुशिलाबाई यादव, डॉ. अर्चना जगतकर, डॉ. अक्षता गावडे, पुतळाबाई मिणचेकर, शर्मिला शानेदिवाण, ॲड. सुनिता भिंगारदेवे, डॉ. शोभा चाळके, ॲड. शितल देसाई, अनिता काळे, भारती पाटील, शोभा मिणचेकर, प्रभावती गायकवाड, निर्मला शिर्के, क्रांती आवळे, प्रियांका पाटील, प्रिती गायकवाड, सरिता तरटे, प्रियांका डावरे, रंजना सानप, राजश्री शिरोडकर, शर्मिला मोरे, मयुरी जगतकर, प्रज्ञा कांबळे, कमल ठाणेकर, शैलजा शिंदे, सीमा पाटील, षण्मुखा अर्दाळकर, आशा रावण, ज्योत्स्ना सावंत, प्रा. शशिकला सरगर, वंदना दीक्षित, नुतन गोंधळी, सुजाता कांबळे, प्रा. प्रतिभा पैलवान, क्रांती कांबळे, उषा कोल्हे, सरिता कांबळे, कमल कवठेकर, हिराताई देशमुख, सविता हुपरीकर, वेदा सोनुले, दयाताई मांढरे, छाया महापुरे, सरिता माने, धनश्री नाझरे, मनिषा नाईक, पूनम शास्त्री, यास्मिन मकानदार, उषा गवंडी, ॲड. तमन्ना मुल्ला, संगीता चौगुले, सारिका बेलेकर, गीता कांबळे, अक्काताई कांबळे, अस्मिता घोलप, ॲड. सुबोधिनी चव्हाण, आशा केसरकर, कुसूम राजमाने, वंदना साळुंखे, भाग्यश्री पाटील, विजया कांबळे, माया तामगावे, उषा गोंजारी, अनिता बावडेकर, छाया माने, राजश्री मधाळे, रेखाताई कांबळे, लताताई नागावकर, रेश्मा खाडे, रोहिणी भोसले, मंदाकिनी तरटे, सुनिता खिल्लारे, ज्योती डोंगरे, मंगल समुद्रे, अस्मिता येरुडकर, शुक्राली सावंत, अॅड. वनिता भोरे, नूतन हातकणंगलेकर, दिपमाला कांबळे, सारिका कांबळे, वैशाली गवळी, राणी कांबळे, मनिषा डोणे, प्रा. अनुजा कांबळे, वृषाली कवठेकर, डॉ. सुजाता नामे, अनिता गायकवाड, डॉ. निकिता चांडक, प्रणोती लोंढे, नीती उराडे, विमल पोखरणीकर, अश्विनी जगताप, शैलजा साबळे, लक्ष्मी कांबळे, पद्मा कांबळे, पुनम मेधावी, अॅड. प्रिती पवार, लता पुजारी, बिदावती पासवान, शर्वरी पाटोळे या शंभर निवडक महिलांचा त्यांच्या सहकुटुंब व मित्र परिवारासह विशेष सत्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, सुप्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक अनुप जत्राटकर, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला अंतिम कोल्हापूरकर, अनिता गायकवाड, नीती उराडे, विमल पोखरणीकर उपस्थित होत्या.