मेहकर : 27 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोक हॉल मेहकर येथे तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर आयोजित तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना राजमाता माँ जिजाऊ स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा उत्कृष्ट पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारिता आणि साहित्याने समाजाची निरपेक्ष सेवा केल्याबद्दल व वैशिष्ट्यपूर्ण सन्मानार्थ त्यांना ” राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई, भाई कैलास सुखधाने,आफताब जी खान, किशोर गवई, भास्करजी काळे, अनिल शर्मा, अरुण डोंगरे, छोटु गवळी, कुणाल माने, यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रवी मिस्किन, गजानन सरकटे दुर्गादास अंभोरे, संदीप राऊत, सुनिल वनारे, राधेशाम खरात,महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, लक्ष्मी कस्तुरे, प्रतिभा गवई, कांचन मोरे, निता पैठणे, उषा सगट, आम्रपाली गवई, दैनिक मेहकर टाइम्सचे वृत्त संपादक विशाल फितवे सर, यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात अशोका हॉल मध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाचे बहाद्दर सूत्रसंचालन कृष्णा हावरे सर यांनी केले. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार 2024, आदर्श सरपंच पुरस्कार , राज्यस्तरीय भीम रत्न पुरस्कार , आदर्श उद्योग प्रेरणा गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय विधी तज्ञ आदर्श पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा, तथागत भूषण आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार, अशा एकूण आठ प्रकारात पुरस्कार वितरित करण्यात आला. बुलढाणा जिल्हृयासह राज्यभरातून आलेल्या एकूण १४४ व्यक्तींना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युनुस भाई पटेल यांनी केले. पत्रकार सिद्धार्थ तायडे यांना ” साहित्यरत्न लोकशाही डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार २०२४ मिळाल्याबद्दल त्यांचे गावकऱ्यासह समाज बांधवांकडून व मित्रमंडळी कडून अभिनंदन होत आहे.