Home महाराष्ट्र नव्या पिढीची कविता सकस असुन लिहित्या हातांना बळ मिळावे : कवी प्रकाश...

नव्या पिढीची कविता सकस असुन लिहित्या हातांना बळ मिळावे : कवी प्रकाश घोडके

65

▪️शब्दगंध च्या वतीने ‘फराळ दिवाळी कवितेचा’ कार्यक्रम संपन्न.

✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहिल्यानगर(दि. 4नोव्हेंबर):– आजच्या नवोदित कवींची कविता सकस असून नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे, या कवितेला निश्चितच भवितव्य असून शब्दगंध सारख्या साहित्यिक संस्था विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक,कवी, चित्रपट गीतकार प्रकाश घोडके यांनी व्यक्त केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दीपावली पाडवा भाऊबीज निमित्ताने आयोजित “फराळ दिवाळी कवितेचा” कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी विचारपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुसूदन मुळे,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, प्रा.डॉ.सुधाकर शेलार, ज्ञानदेव पांडुळे,माजी प्राचार्य जी.पी ढाकणे,पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप सांगळे,प्राचार्य अशोकराव दौंड,जि.प.चे माजी सदस्य सचिन जगताप,शाहीर अरुण आहेर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक, सचिव सुनील गोसावी इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रकाश घोडके म्हणाले की, नवोदितांच्या पाठीवर शाबासकीची थाप शब्दगंध देत असून या प्रेरणेमुळेच अनेक साहित्यिक निर्माण होत आहेत.अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुधाकर शेलार म्हणाले की,माणसांच्या मनातील भाव संवेदना जागा झाल्या की शब्द रूपाने त्याची कविता बनते,कथा बनते, अनुभवाने या कथा,कविता सकस निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी दुसऱ्यांच्या कथा कविता वाचणे अथवा ऐकणे महत्त्वाचे आहे, शब्दांचे जग अद्भुत असून त्याचा अंदाज येणे महत्त्वाचे आहे.

डॉ.संजय कळमकर यावेळी बोलताना म्हणाले की, आज साहित्याचा जागर करत असताना पद्यान बोलावं गद्यान थांबावं, मराठी भाषेच्या जागृतीसाठी छोट्या मोठ्या साहित्यिक कार्यक्रमाची आवश्यकता आहे आणि ती अशा कार्यक्रमातून भरून निघू शकते, आजचे नवोदित उद्याचे मान्यवर होऊ शकतात, त्यासाठी लेखनामध्ये सातत्याने हवे. आपल्या रचना सादर करण्यापूर्वी त्या पुन्हा पुन्हा स्वत: वाचल्या पाहिजेत. यावेळी झालेल्या काव्य संमेलनात गिताराम नरवडे, आत्माराम शेवाळे,रुक्मिणी नन्नवरे,सुजाता पुरी, प्रशांत सूर्यवंशी, सुभाष सोनवणे, प्रबोधिनी पठारे, समृद्धी सुर्वे,वर्षा भोईटे, बबनराव गिरी, डॉ.रमेश वाघमारे, शाहिर वसंत डंबाळे,दुर्गा कवडे, सुरेखा घोलप, ऋता ठाकूर, सुमेध ब्राह्मणे, गोकुळ गायकवाड, विठ्ठल सोनवणे, एम.पी दिवाण, सुनील धस, नवनाथ वाळके, शितल मंडलिक डॉ.मनीषा सोनवणे, गौरव भुकन, शुभांगी केसकर, अनिल खांदवे, रामदास कोतकर, बाळासाहेब देशमुख,विनायक पिंपळकर, महिर कुलकर्णी, देविदास थोरात, देविदास बुधवंत यांनी आपल्या बहारदार रचना सादर केल्या.
उपस्थित मान्यवरांसह सर्व कवींचा पुस्तक,डायरी व पेन भेट देऊन शब्दगंध च्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले तर सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. शेवटी प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे,राजेंद्र पवार,ऋषिकेश राऊत, दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत, शर्मिला रणधीर,जयश्री राऊत, आरती गिरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी डी.के. ठूबे,डॉ.अनिल गर्जे,फिरोज शेख, बी.के.राऊत, अजित कटारिया,शब्बीर शेख, रूपाली सातपुते, माधवी जक्कल, कविता भालेराव, राम खुडे,सुपर कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका शबाना शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here