Home यवतमाळ ‌माणुसकीची भिंत पुसदने वृद्धाश्रम व गरजवंतासोबत भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा

‌माणुसकीची भिंत पुसदने वृद्धाश्रम व गरजवंतासोबत भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा

33

 

 

बाळासाहेब ढोले, पुसद प्रतिनिधी मो. 78751 57855

 

पुसद -येथील माणुसकीची भिंत ही गरजवंताना व अनाथांना कपडे वाटप करून व दररोज दोन वेळेस अन्नदान करून मागील नऊ वर्षापासून नेहमीच मदत करत असते, तसेच दरवर्षी जे अनाथ व निराधार आहेत अशा लोकांसोबत सण साजरे करत असते.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्यांनी वृद्धाश्रमात व माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे, गरजवंत निराधारांन सोबत भाऊबीजीचा सण साजरा केला. भाऊबीजेचा रविवार उजेडाला बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम येथे सकाळी महिला सदस्यांची वर्दळ वाढली, माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्यांकडून वृद्धाश्रमाची स्वच्छता करण्यात आली, रांगोळ्यांनी आंगण सजले, पाटे मांडण्यात आली ,पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली, ताटे तयार करण्यात आली, वृद्धाश्रमातील वृद्धांना मोठ्या मायेने पाटावर बसवून, टॉवेल टोपी व कपडे देऊन ओवाळण्यात आले, त्यानंतर त्यांना बिस्किट व फराळाचे देण्यात आले नंतर भाजी पोळी भात व बुंदीच्या लाडूचे सुग्रास जेवण देण्यात आले. वृद्धांन सोबत भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना मायेची उब देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना टॉवेल,टोपी,जेवण व फराळाचे देऊन ओवाळण्यात आले व तेथील महिलांच्या हाताने माणुसकीची भिंत सदस्यांनी ओवाळून घेतले व त्यांना साड्या लुगडे व मुलांना कपडे देण्यात आले.यावेळेस माणुसकीच्या भिंतीचे मदत करणारे दाते व शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here