पुणे – लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे गैलेक्सी तर्फे गरजू,दीन दुबळे व निराधारांना पुण्यातील जनता वसाहत येथे नुकतेच मोफत दिवाली फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गवर्नर ला. विजय सारडा उपस्थित होते . यावेळी क्लबचे जेष्ठ सदस्य पास्ट रिजन चेयरपर्सन राजेंद्र गूगले यांनी डिस्ट्रिक्ट गवर्नर ला. विजय सारडा व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. क्लब अध्यक्षा ला. रेखा आखाडे यांनी विविध मान्यवरांचा सत्कार केला . यावेळी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ला. रवी गोलार , डिस्ट्रिक्ट को-ओर्डिनेटर ला. आर के शहा,लायन्स क्लब ऑफ पुणे गैलेक्सीसीच्या अध्यक्षा रेखा आखाडे,सचिव ला. किरण भालेराव, खजिनदार ला. कादंबरी वेदपाठक, ला. दिपक लोया, ला. सतीश राजहंस, ला. विजय रोड़े, पास्ट रिजनल चेअरपर्सन ला. राजेंद्र गुगले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डिस्ट्रिक्ट गवर्नर ला. विजय सारडा यांच्या हस्ते गरजूंना लाडु व चिवडा पैकेटचे वितरण केले.ला. राजेंद्र गूगले यांनी गैलेक्सी क्लबच्या स्थापनेपासुन आतापर्यंत केलेल्या समाज उपयोगी कार्याची माहिती उपस्थिताना दिली व फराळ वाटप या उपक्रमा मागील भावना सर्वाना समजावून सांगीतली. या नंतर डिस्ट्रिक्ट गवर्नर ला. विजय सारडा यांनी लायन्स क्लबच्या कार्याची थोडक्यात माहिती सर्वांना देऊन उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. . समाजात जे दीन दुबळे व गरीब आहेत त्यांची सुद्धा दिवाली गोड व्हायला हवी या उदात्त हेतुने क्लब अध्यक्षा ला. रेखा आखाडे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या बद्दल सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. राजेंद्र गुगले यांनी केलें. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्षा ला. रेखा आखाडे, सचिव ला. किरण भालेराव, खजिनदार ला. कादंबरी वेदपाठक ला. दिपक लोया, ला. सतीश राजहंस यांनी विशेष परिश्रम घेतले . या प्रसंगी व डिस्ट्रिक्ट चे इतर संन्मानीय लायन्स तसेच गैलेक्सी क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.