Home महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा चा चिटणीस पदावर दादासाहेब...

महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा चा चिटणीस पदावर दादासाहेब शेळके (स्टार प्रचारक) यांची नियुक्ती

81

✒️सिध्दार्थ दिवेकर(विशेष प्रतिनिधी)मो.9823995466

मुंबई (दि. 3 नोव्हेंबर):-नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर दिलेले योगदान लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके (स्टार प्रचारक) यांची चिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली.

पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा विश्वास नियुक्ती पत्रात व्यक्त केला आहे.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

चिटणीस या पदावर यांची नियुक्ती केल्याबद्दल पत्रकार शामदादा धुळे, सिध्दार्थ दिवेकर, कैलास कदम व अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here