Home महाराष्ट्र हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचाराचे नारळ फुटले !

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रचाराचे नारळ फुटले !

85

▪️जनतेचे प्रेम आणि आशिर्वाद हेच माझं बळ आहे — आमदार देवेंद्र भुयार

▪️श्री.संत यशवंत महाराज यांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि. 3नोव्हेंबर):-मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचा प्रचार करण्यासाठी मतदार संघातील हजारो नागरिक सज्ज झाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी यांनी रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी चा मुहूर्त साधत श्री.संत यशवंत महाराज देवस्थान मुसळखेडा येथे महाआरती करून विधानसभा निवडणुक 2024 च्या प्रचाराचा शुभारंभ केला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणल्यामुळे शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा योजना, पांदन रस्ते, सिंचन प्रकल्प, यासह आदी विकासकामे मतदार संघामध्ये पूर्णत्वास गेल्यामुळे मतदार संघातील हजारो युवक महिला नागरिक यांचा मोठा प्रतिसाद आमदार देवेंद्र भुयार यांना मिळत आहे. मतदारसंघात घरोघरी पत्रके वाटून उमेदवार देवेंद्र भुयार यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यांचे स्वागत करून सोबत राहण्याचा विश्वास दिला. गेल्या पाच वर्षांत कार्यालयाचे दरवाजे सताड उघडे ठेऊन सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

नागरी विकास कामे, डिजिटल शाळा, पांदन रस्ते, सिंचन प्रकल्प, रखडलेल्या जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, आरोग्य, शिक्षण आणि अन्य सोयी-सुविधा मार्गी लावून आमदार देवेंद्र भुयार यांनी नागरिकांना दिलासा दिल्याच्या प्रतिक्रिया विविध भागांतील नागरिकांनी दिल्या. “तर पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची संधी द्या,” असे आवाहन आ. देवेंद्र भुयार यांनी केले.

पहिल्याच दिवशी महायुतीचे उमेदवार आमदार देवेंद्र भुयार यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी बोलताना आ. देवेंद्र भुयार यांनी नागरिकांचे आभार मानले. दररोज मी नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा प्रयत्न करीत असतो. आपणा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासामुळेच मी ही विकासाची कामे करु शकलो. कोणताही राजकीय वारसा नसतांना तुम्ही जनता जनार्दनांनी मायेनं माझी साथ दिली आहे.

त्यामुळे मतदारसंघात विकासाच्या बाबतीत ही उंची आपल्याला गाठता आली आणि जी काही कामे अपूर्ण अवस्थेत असतील किंवा राहिली असतील ती पुर्णत्वास नेण्याचा निर्धार आपल्या साक्षीने करतोय.तुमच प्रेम आणि आशिर्वाद हेच माझं बळ आहे.या जनता जनार्दनाच्या सेवेत पुढेही कधी खंड पडू देणार नाही हा माझा शब्द आहे.यावेळी देवेंद्र भुयार यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here