Home महाराष्ट्र फ्रिडमने अपघातमय चौकातील गति अवरोधकाला दाखविले दर्शनिय

फ्रिडमने अपघातमय चौकातील गति अवरोधकाला दाखविले दर्शनिय

123

▪️ शनिवारी साकोलीत घडला होता चौकात सुसाट वाहनाने अपघात 

▪️किशोर बावणे यांचा प्रथम पुढाकार

✒️साकोली(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

साकोली(दि. 3नोव्हेंबर):- काल शनिवारी दुपारी १२ दरम्यान जूने पंचायत समिती समोरील गणेश वार्ड व सिव्हिल वार्ड जोड रस्त्यावर भरघाव बोलेरो जीपची दूचाकीला जबरदस्त धडक बसली. यात गणेश वार्डातील कर्तव्यदक्ष महेश ( हिरो ) साखरे हे गंभीर जखमी झाले. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांनी संदीप गुप्ता, महेश उपासे यांच्या सहकार्याने तेथे न दिसणाऱ्या गती अवरोधकाला व्हाईट रंगाने झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारून एक माणूसकीची मिसाल कायम केली आहे.

शनिवारी याच चौकात दूपारच्या जेवणाला स्कुटीने घरी जात असता रोडवर भरघाव बोलेरो जीपने महेश साखरे यांना जबरदस्त धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की बोलेरो वाहन सुसाट वेगाने आणि गती अवरोधकाला न जूमानता बेजबाबदारपणे वाहन चालवून कुणाचा बळी घेण्याचा गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

येथून चारचाकी व दूचाकी वाहने नेहमीच वेगाने पळवितात. पण येथे दोन्ही बाजूंची क्रॉसिंग असून सायकलस्वार विद्यार्थी, दूचाकीस्वार नागरिकांची रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. येथे असलेला गती अवरोधक दूरून स्पष्ट दिसत नाही. पुढे अशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी किशोर बावणे यांनी रविवार ०३ नोव्हेंबरला स. ०७ वाजता स्वतः व्हाईट रंगाचा पक्क्या झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारून एक माणूसकीची मिसाल कायम केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here