Home अमरावती महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना यांची निवड...

महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

177

 

 

अमरावती ( प्रतिनिधी )-स्थानिक वऱ्हाड विकास प्रकाशन संस्थेच्या वतीने सन 1995 मध्ये बुद्ध – फुले – शाहू – आंबेडकरांच्या सत्यशोधकीय विचारांची पेरणी करण्यासाठी महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाची सुरुवात झाली होती. मागील बावीस राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिग्गज मान्यवरांनी भूषविले आहे.त्यामध्ये प्रा.हरी नरके,ॲड.गोविंद पानसरे, उद्धव शेळके, प्रा.सतेश्वर मोरे, विजयकुमार लडकत ( पुणे ), प्रा. अरविंद माळी, प्रा.आ.ह. साळुंखे, चंद्रकांत वानखडे, आयएएस भाग्यश्री बानायत ( ढिवरे ), ॲड.रामनारायण चव्हाण (दिल्ली ), प्रा.मा.म. देशमुख, प्रा.सुकुमार पेटुकले (आंध्र प्रदेश), प्रा. भाऊ लोखंडे, प्रा. पी. जी. भामोदे, प्राचार्य सुधीर महाजन,यदू जोशी (मुंबई ), प्रा. विलास पाटील(धुळे) इत्यादी विचारवंतांसह इतरही मान्यवरांनी अध्यक्षपद भूषविले होते.
23 व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे सर्वोदय शिक्षण समितीद्वारा संचालित महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, हिवरखेड आणि वऱ्हाड विकासाच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजन केले आहे.
ख्यातनाम पुरोगामी लेखिका डॉ.रजिया सुलताना यांची महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी बैठकीत मांडला. त्याला श्री साहेबरावजी पाटील, प्राचार्य रवींद्र वासनकर, वसंतराव तडस,पांडुरंग पाटील, वामनराव भडके, मदनलाल शर्मा, प्रकाशराव भोजने,अरविंद आमले, रमेशराव भोजने,मधुकर कवठकर,प्राचार्य श्रीमती एस. एस.दातीर तसेच वृक्ष मित्र नारायण मेंढे यांनी समर्थन दिले.
महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.रजिया सुलताना यांचे उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, कै.मौनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अरुण बुंदेले,सौ.ज्योती नागदिवे, श्रीमती कमलाताई मेश्राम तसेच वऱ्हाड विकास, डॉ.आंबेडकर समाज भूषण संघ,महानायक संघटना,तथागत बुद्ध संघ आणि फुले -शाहू- आंबेडकरी संघटनांच्या वतीने डॉ.रजिया सुलताना यांचा शाल,पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार त्यांच्या अमरावती येथील गृहालयी दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आला.
——
डॉ.रजिया सुलताना यांचे महिला सुरक्षेसाठी अनमोल कार्य -प्रा.श्रीकृष्ण बनसोड

याप्रसंगी अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, ” डॉ.रजिया सुलताना यांचे महिला सुरक्षेसाठी असलेले कार्य अनमोल आहे. त्या लेखणीतून आणि विचारपीठावरून समाजातील अनिष्ट रूढिंवर प्रहार करून समाजाला धर्मनिरपेक्षतेचा विचार देत आहेत.मानवतेची शिकवण देत आहेत.महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या पहिल्या वर्षापासूनच्या आयोजनातील त्या साक्षीदार आहेत .” असे विचार व्यक्त केले .
————-
डॉ.रजिया सुलताना यांचे सर्व स्तरातील महिलांसाठी कार्य – प्रा. अरुण बुंदेले

प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी सत्काराप्रसंगी ,” पुरोगामी लेखिका रजिया सुलताना यांचे आजपर्यंत 34 पुस्तके प्रकाशित झाली असून सात पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.त्यांचे लेखन हे पुरोगामी आणि विद्रोही असून समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहे.त्यांचे कार्य हिंसामुक्त समाज व भयमुक्त नारीसाठी सतत सुरू असते,त्यासाठी त्यांचे सतत लढे सुरू असतात. समाजातील सर्व गटातील महिलांवर त्यांनी आजपर्यंत वृत्तपत्रात लेखन केले आहे. म. फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्याअध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो.” असे विचार व्यक्त केले.
सत्काराच्या कार्यक्रमाचे संचालन श्री रामकुमार खैरेयांनी केले तर श्री गोविंद फसाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here