Home चंद्रपूर चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी

चिमूर मतदारसंघातील उमेदवारांची खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर रोजी

158

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी मो. 8605592830

चंद्रपूर, दि. 31 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 74- चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 9, 13 व 19 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार चिमूर विधानसभा मतदारसंघात प्रथम खर्च लेखा तपासणी शनिवार दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी बुधवार, दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी मंगळवार दि. 19 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे करण्यात येईल.
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार कार्यालय, चिमूर येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपाासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे चिमूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here