जळगाव – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धा या शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आल्या आहेत काल दिनांक ३० रोजी झालेल्या १४/१७/१९ आतील मुलांच्या स्पर्धेत जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी एकुण १ सुवर्ण, ५ रौप्य, ६ कांस्यपदक मिळविले त्यांना प्रशिक्षक जयेश बाविस्कर, हरिभाऊ राऊत, जयेश कासार, सुनिल मोरे, याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू – १९ वर्षे वयोगटात ( ४५ किलो आतील वजन गटात दानिश रहेमान तडवी ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर ) याने सुवर्णपदक पटकावले आणि पुढील महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
रौप्य पदक विजेते : – १)५५ ते ५९ किलो वेदांत क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर ) २) ३५ ते ३८ किलो सतिष क्षिरसागर ( इंदिराबाई ललवाणी, जामनेर )
३) ७८ किलो वरील देवेश सोनवणे ( ( सावित्रीबाई फुले पहुर )
४) ५५ ते ५९ किलो लोकेश महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर )
५) साहिल बागुल एम. एम. विद्यालय ( पाचोरा )
कांस्यपदक विजेते :- १) २९ ते ३२ किलो भावेश अण्णासाहेब निकम ( सावित्रीबाई फुले पहुर) २) ३८ ते ४१ किलो मयुर राम पाटील ( प्रोग्रेसिव्ह इंग्लिश, जळगांव ) ३) ५९ ते ६३ किलो प्रबुद्ध समाधान तायडे ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) ४) ४८ ते ५१ किलो अमर अशोक शिवलकर ( यशवंत विद्यालय ) ५) ५१ ते ५५ किलो अनिरुद्ध सुनिल महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ) इत्यादी सदर सर्व विजेत्यांचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन उपाध्यक्ष श्री ललीत पाटील महासचिव श्री अजित घारगे कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार सहसचिव श्री रविंद्र धर्माधिकारी सदस्य श्री सौरभ चौबे, श्री महेश घारगे, श्री नरेंद्र महाजन, श्री कृष्णकुमार तायडे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे आदिनीं कौतुक करून शुभेच्छा दिल्या