Home यवतमाळ यूपीएससी,एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे स्मृतीशेष उमाजी मनवर यांच्या स्मरणार्थ पुस्तके अभ्यासिकेला भेट

यूपीएससी,एमपीएससी स्पर्धा परीक्षेचे स्मृतीशेष उमाजी मनवर यांच्या स्मरणार्थ पुस्तके अभ्यासिकेला भेट

84

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो. 9823995466

पुसद:- (दिनांक 31ऑक्टोंबर) तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे काल कथित उमाजी धोंडीबा मनवर (शेंबाळपिंपरीकर) राहणार मुंबई यांच्या स्मरणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका वाचनालय शेंबाळपिंपरी यांना यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा इत्यादी पुस्तके प्रशांत उमाजी मनवर, प्रवीण उमाजी मनवर यांच्याकडून भेट देण्यात आले.

भारतरत्न, बोधिसत्व,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संपूर्ण आंबेडकरी तरुणांचे भवितव्य अभ्यासातून उज्वल होण्यासाठी आणि यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेऊन उच्चपद गठावे या हेतूने मनवर परिवाराकडून ही दहा हजार रुपयाची पुस्तके भेट देण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाला प्रामुख्याने गौतमभाऊ येवले (सामाजिक कार्यकर्ते नांदेड), रंगनाथ कांबळे माधव मनवर (वंचित बहुजन आघाडी, शेंबाळपिपरी), सुभाष मनवर, नामदेव मनवर,आशिष मनवर इत्यादी अनेक नवयुवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here