✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २९ ऑक्टोंबर) उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, सहकार्याने व विश्वासाने आज विधानसभा निवडणुकीसाठी रुग्णसेवक भाविक भगत यांनी भव्य नामांकन रॅली काढून अपक्ष उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला.
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी एक जबाबदारी आहे, आणि तुमचं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास यामुळेच ही जबाबदारी पार पाडण्याची ताकद मिळते.
आपल्या हक्कांसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि मतदार संघाच्या विकासासाठी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचा आशीर्वादच माझ्या कार्याची प्रेरणा आहे. म्हणून उमरखेड – महागाव विधानसभा मतदार संघातील आपली माणसं – तुमच्या विश्वास, आशीर्वाद आणि पाठिंब्यावर आजचा महत्त्वाचा टप्पा पार केला.
आज शेवटच्या दिवशी उमरखेड विधानसभेची अपक्ष उमेदवारी अधिकृतपणे तहसील कार्यालयात दाखल केली.
तुमच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा माझा निर्धार आणखी मजबूत झाला आहे.
चला, एकत्र येऊ उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवू…!
आज पर्यंत मी आपण सर्वांची रुग्णसेवा, जनसेवा करत आहोत मी नेहमी तुमच्या सुखदुःखात धावून आलो मी आपणास विनंती करतो मला अजून पुढे चांगलं काम करण्याची आपण संधी द्यावी.
मी आपला एक मुलगा, एक भाऊ या नात्याने काम करत आहे. आणि यापुढेही करणार आहे. आपण मला साथ द्यावी मतदारसंघातील अनेक प्रश्न मला सोडवायचे आहेत. – भाविक भगत
यावेळी अनुप शेखावत सह भाविक भगत फाउंडेशन युवा ब्रिगेडचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उमेद महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.