अनिल साळवे (परभणी जिल्हा प्रतिनिधी) मो. 86985 66515
गंगाखेड :- गंगाखेड विधानसभा मतदारसंघासाठी महायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकरजी गुट्टे साहेब यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी, निघालेल्या रॅलीत गर्दीचा ‘महापूर’ आला होता. ‘न भूतो न भविष्य’ अशी ही रॅली साहेबांच्या विजयाचीच हमी देत होती. सगळीकडे गर्दीच गर्दी. जिकडे बघावे, तिकडे माणसंचं माणसं. ड्रोन कॅमेऱ्यालाही टिपता न येणारे हे चित्र आज ‘याचि देही याचि डोळा’ पाहाता आले. त्यामुळे पुन्हा एकदा साहेबच हा आत्मविश्वास आला आहे.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उभे असलेले कर्तव्यदक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी मतदारसंघाच्या गावोगावी आणि घरोघरी आपला दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे. त्यामुळे आज प्रत्येक जण त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला हजर झाला होता. ओसांडून वाहाणारी ही सगळी गर्दी पाहून सगळेच आवक झाले होते. त्यामुळे ही गर्दीच येत्या २३ तारखेला आ.डॉ.गुट्टे साहेब यांना विजयाचा ‘गुलाल’ लावेल, याची खात्री आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष, मित्रमंडळ व महायुतीचे जीवाभावाचे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, महिला, नागरिक, युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.