Home यवतमाळ महाविकास आघाडीच्या प्रचंड शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल ! साहेबराव कांबळे यांचा विजय...

महाविकास आघाडीच्या प्रचंड शक्तिप्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल ! साहेबराव कांबळे यांचा विजय मेळावा (ढोल-ताशांच्या गजरात साहेबराव कांबळे यांचे स्वागत)

133

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक २८ ऑक्टोंबर) तालुक्यातील आगामी निवडणुकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, महाविकास आघाडीचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी आपल्या उमेदवारी अर्जाचे नामांकन जल्लोषात दाखल केले.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याने तालुक्यातील वातावरणात अभूतपूर्व उत्साह संचारला आहे.
सकाळपासूनच उमरखेडमध्ये कार्यकर्त्यांचे लोंढे जमा होऊ लागले होते. गावागावांतून आलेले कार्यकर्ते, समर्थक, स्थानिक नेते, महिलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वजण मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी झाले होते.

ढोल-ताशांचे गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांच्या आवाजात संपूर्ण परिसर दुमदुमत होता. या अभूतपूर्व
मेळाव्यामुळे उमरखेडच्या राजकीय क्षितिजावर एक नव्या ताकदीची नोंद झाली आहे.

साहेबराव कांबळे यांनी आपल्या समर्थकांचे आभार व्यक्त करत, “तुमची ही ताकद आणि प्रेम

माझ्यासाठी एक प्रेरणा आहे. या आशीर्वादामुळे मी तालुक्याच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे,” असे भावनिक शब्दांत सांगितले. तसेच, कार्यकर्त्यांना एकजुटीची शपथ देत, “महाविकास आघाडीच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील समस्या सोडवून विकासाची दिशा निर्माण करणे हेच आपले ध्येय आहे,” असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या या लोंढ्यामुळे उमरखेड परिसरात एक वेगळाच उत्साह आणि जोश निर्माण झाला होता.

स्वागत महाविकास आघाडीच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या या विशाल जनसमूहामुळे तालुक्यातील जनतेत नव्या आशावादाची भावना निर्माण झाली आहे. समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात साहेबराव कांबळे यांचे स्वागत करत त्यांच्याबद्दलचा आपला विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी तालुक्यातील अनेक नेत्यांनीही त्यांच्या समर्थनाची ग्वाही दिली. मेळाव्यात विविध स्तरांतील समाजसेवक, व्यापारी, युवक संघटनांचे पदाधिकारी, महिला मंडळे यांचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता.

साहेबराव कांबळे यांच्या या मेळाव्याने उमरखेडच्या राजकारणाला एक नवीन दिशा दिली आहे, असे स्थानिकांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here