बाळासाहेब ढोले (विशेष प्रतिनिधी ) मो. 78751 57855
पुसद – येथील गुलाम नबी आजाद विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त पुढील शब्दात आत्तदिप धुळे यांनी आपले विचार मांडले.
शिक्षण घेणे म्हणजे फक्त नोकरी करणे नसून त्या शिक्षणाचा उपयोग समाज जागृतीसाठी, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाला पाहीजे.
माणसाची श्रद्धा असावी परंतु ती अंधश्रद्धा नसावी. कुठलीही गोष्ट जाणून घेऊन त्याची छाननी करून आपल्या सद्वविवेक बुद्धीला पटल्या नंतरच ती मान्य करावी एखादी कृ-पथा चालत आली असेल परंतु ती जर मानवी जीवनाला अडथळा निर्माण करत असेल तर ती कृ- प्रथा समाजातून नष्ट करण्यासाठी प्रत्येक समाजकार्यकर्त्याने प्रयत्न करायला हवा.
समाजातील पक्षाच्या मागे फिरणारे कार्यकर्ते न बनता समाजातील अंधश्रद्धा, वाईट प्रथा, नष्ट करून एक आदर्श समाजाची निर्मिती करून भारताला शैक्षणिक दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या बळकट करण्याचे काम प्रत्येक समाजकार्यकर्त्याने करावे आणि प्रत्येकाने माझे शिक्षण माझ्या समाजाच्या सर्वांगिक विकासासाठी कशे उपयोगात आणता येईल याचा विचार करावा, असे सांगून समाजकार्यकर्त्याची भूमिका मांडत असताना “माझे शिक्षण माझ्या समाजासाठी” हेच ध्येय घेऊन मी सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. आणि त्यासाठी मी शरीरात प्राण असे पर्यंत संघर्ष करेन असे प्रखड मत त्यांनी उपस्थीतांसमोर व्यक्त केले.