Home यवतमाळ गावंडे महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांची रेड रिबन क्लबला भेट

गावंडे महाविद्यालयातील रासेयोच्या विद्यार्थ्यांची रेड रिबन क्लबला भेट

134

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. २१ ऑक्टोंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्याकरिता उमरखेडच्या आयसीटीसी उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली. रेड रिबन क्लबच्या समुपदेशक वैशाली घोंगडे यांनी एच.आय.व्ही. एड्सबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसनही केले.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैशाली धोंगडे म्हणाल्या की, रेड रिबन क्लब हे एड्सविरोधी लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

या क्लबचे कार्यक्रम आणि उपक्रम एड्सविषयी समाजात जागरूकता वाढवण्यात आणि संक्रमण रोखण्यात मदत करतात. एड्सग्रस्त व्यक्तींना समर्थन देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यातही क्लबचे योगदान असते.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने यांनीही मनोगत व्यक्त केले.

रेड रिबन क्लब ही एड्स जागरूकता आणि प्रतिबंधासाठी कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. एड्सविषयी जनजागृती करणे, संक्रमण रोखणे आणि एड्सग्रस्त व्यक्तींना समर्थन देणे हा या क्लबचा उद्देश आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी व रेड रिबन क्लबचे सर्व विद्यार्थी या अभ्यास भेटी दरम्यान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here