Home महाराष्ट्र देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेवर-न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे

देशातील प्रत्येक नागरिकांच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्याय व्यवस्थेवर-न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे

68

 

 

गंगाखेड : – गंगाखेड येथे दिनांक २० ऑक्टोबर रोजी गंगाखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारत कोनशिला समारंभा पार पडला.
गंगाखेड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयच्या इमारत परिसरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
परभणी जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या नूतन इमारत कोनशिला समारंभप्रसंगी महाराष्ट्र, गोवा वकील संघांचे माजी अध्यक्ष अँड. वसंतराव साळुंके, सदस्य अँड. सतीश देशमुख, अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश दिनेश कुरुलकर, गंगाखेड वकील संघांचे अध्यक्ष अँड. विवेक निळेकर आदी मान्यवरांची विचार मंचावर प्रमुख उपस्थिती होती. तर दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायाधीश ए. आर. सईद, न्यायाधीश श्रीमती आर. आर. बेडगकर, न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे, न्यायाधीश श्रीमती गुलफराज एम. बिरादार, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, सार्वजनिक बांधकाम नांदेड विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे, कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपविभागीय अभियंता बालाजी पवार यांच्यासह स्थानिक आ. गुट्टे, छत्रपती संभाजीनगर वकील संघांचे उपाध्यक्ष अँड. श्रीकांत कवडे, जिल्ह्याचे सरकारी वकील अँड. बी. यु. दराडे, अँड. सचिन वाकोडकर, अँड. सचिन पौळ, अँड. उमाकांत फड, अँड. मंचकराव सोळंके आदी मान्यवरांची व गंगाखेड न्यायालयातील न्यायधिशांची विचार मंचासमोर उपस्थिती होती.

न्यायालयाची प्रतिमा समाजात देवाच्या मंदिरासारखी असून यात असणाऱ्या न्यायधीशाला समाजात देवळातला देव समजल्या जात असल्याने न्यायालयीन कामकाजाचे स्वामीत्व जपणं ही न्याय व्यवस्थेतील सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत पुढे बोलतांना न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे म्हणाले की अपुऱ्या व्यवस्थेचा कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने या नूतन इमारतीत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आधुनिक सेवा सुविधामुळे येथील न्यायदानाच्या कामाला गती येऊन पक्षकाराला लवकरात लवकर न्याय मिळणार असल्याचे नमूद करत इमरतीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ठरवून दिलेल्या वेळेत नूतन इमारतीचे काम पूर्ण करून न्यायदानाच्या कामासाठी इमारत उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघांचे अध्यक्ष अँड. विवेक निळेकर यांनी केले तर अध्यक्षीय भाषण परभणी जिल्हा न्यायालयच्या प्रमुख न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी केले. आभार अँड. सय्यद सादिक सोनपेठकर यांनी मानले.
यावेळी गंगाखेड तालुक्यासह परभणी, पालम, मानवत, पूर्णा, सोनपेठ, वसमत, देगलूर, परळी आदी तालुक्यातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाखेड येथील सर्व न्यायधिशांसह अँड. गोविंद पैके, अँड. संतोषराव मुंडे, अँड. गोपीचंद पौळ, अँड. आळनुरे, अँड. मिलिंद क्षिरसागर, अँड. संतोष मुंडे, अँड. संदीप पाठक, अँड. दिपक पौळ, अँड. राजेश्वर शेटे, अँड. दुर्गादास कुकडे, अँड. अमित कच्छवे, अँड. भागवत मुंडे, अँड. अमृत गौरशेटे, अँड. हरीश फड, अँड. श्रीकृष्ण पवार, अँड. आदिनाथ मुंडे, अँड.सत्यभामा (पारवे) घागरमाळे, अँड. मिरा (मोरे) शिसोदिया, अँड. ज्योतिर्लिंग डिगे, अँड. भागवत फड, अँड. तन्वीर अहेमद शेख, अँड. केवळ कांबळे, अँड. सद्दाम खान पठाण आदी वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here