अमरावती : खरंतर आजच्या या काळात जीवन जगत असतांना इथला प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यातले आनंदाचे सोहळे हे स्वतःला अत्यानंद व्हावा, स्वतःची हौस पूर्ण व्हावी नाही तर किमान त्या सोहळ्याचा प्रदर्शनरूपी इव्हेंट व्हावा यासाठी धडपडत असतो..आणि त्यासाठीच वाढदिवसासारखे सोहळे आजकाल फार सोईचे पडत आहेत… ज्या माध्यमातून मौजमस्ती, पार्ट्या व नाचगाने ई. इव्हेंट्स मोठ्या जल्लोषात आज प्रत्येकजण साजरा करत असतो.प्रामुख्याने तरुणाईसाठी तर जणुकाही ही तर पर्वनीच म्हणावे…मात्र अशाप्रकारची वर्तमान परिस्थिती असतांना या सर्व बाबींना बगल देऊन, आपल्या मौजमस्तीला बाजूला सारत स्वतःच्या वाढदिवसानिमित्य एक नवा पर्याय म्हणून समाजपयोगी विधायक कार्यक्रमांची मालिका राबविणे हे खरेतर लक्षवेधी ठरते.. आणि असाच लक्षवेधी वसा बाळगत मागील पाच वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या विचारांने भारवलेले तरुण नेतृत्व शिवश्री.करणं तायडे दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत… दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी त्यांनी हे उपक्रम राबवित असतांना अमरावती शहरातील माँसाहेब जिजाऊ स्मारकासमोर तरुणांसोबत जिजाऊ वंदना म्हणून त्यांनी या सर्व उपक्रमांची सुरुवात केली.. यावेळी जिजाऊ वंदणे नंतर लगेचच त्या ठिकाणी गोरगरीब माय माऊल्यांना साडीवाटप करण्यात आले.सोबतच एकीकडे सनासूदीच्या या कालावधीत श्रीमंतांची लेकरं पैश्यात लोळत असतांना दुसरीकडे दरवर्षीचं इथली गरिबांची लेकरं मात्र किमान मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित राहतात.. त्यातच ज्या बालकांना किमान त्यांच्या हक्काचे मातृपितृ छत्र सुद्धा नाहीत अश्यांची अवस्थातर सांगायलाच नको.. त्यांना तर या सनासूदीला किमान चांगल्या व नव्या कपड्यांची सुद्धा कमतरता असते, हीच बाब लक्षात घेऊन अमरावती शहरातील अधिक्षक शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह येथे अनाथ बालकांना सुद्धा कपड्यांचे वाटप करण्यात आले.ज्यामधून त्या लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे समाधान संपुर्ण टीम ला मिळाले..त्यानंतर याच उपक्रमाचा भाग म्हणून समाजातील अंधश्रध्येचे वाढते प्रमाण व त्यामागे फरफटत जाणारी नवी पिढी डोळ्यासमोर ठेऊन शहरातील प्रसिद्ध यशोदा कोचिंग क्लासेस येथे विध्यार्थ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे विविध प्रात्यक्षिके सादर करून श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजविण्यात आले…शिक्षक व प्रमुख पाहुण्यांना ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान त्याठिकाणी दाखवीलेल्या विविध जादुटोना विरोधी प्रयोगांना उपस्थित विध्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला… यावेळी यशोदा कोचिंग क्लासचे संचालक शिवश्री. शुभम राणे सर व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष सहकार्य केलेत.. यावेळी या संपुर्ण कार्यक्रमाची संपुर्ण धुरा सांभाळण्याचे काम शेवट्पर्यंत मिलिंदभाऊ मेश्राम यांनी केले.. दरम्यान यावेळी स्नेहा वानखडे, वैष्णवी सिरस्कार, विशाखा गवई, प्रा.शुभम राणे सर, प्रा.शुभम कडू सर, अंकुशभाऊ खरड, गजानन मानकर, अमित साबळे, निलेश अंभोरे, कार्तिक इंगळे, अक्षय नांदुरकर, अक्षय राठोड, रमाकांत गायगोले, ऋषिकेश पांडे, अनुजा तायडे, तेजस इंगळे इत्यादी उपस्थित होते.ई. सहकारी उपस्थित होते.