Home महाराष्ट्र मानसिक संतुलन बिघडल्यामुळे समीर भाऊ भुजबळांची बदनामी सौरभ बालमुकुंद जगताप याचे निवेदनाद्वारे...

मानसिक संतुलन बिघडल्यामुळे समीर भाऊ भुजबळांची बदनामी सौरभ बालमुकुंद जगताप याचे निवेदनाद्वारे माहीती

85

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -: समीरभाऊ भुजबळ यांचा एक फोटो येवला शहर व तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे. या फोटोमध्ये समीरभाऊ भुजबळ हे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या बुध्दविहार मुक्तीभूमी येवला या ठिकाणी चप्पल घालून आलेले आहेत असा यात उल्लेख आहे.

खरे तर त्यांनी विश्वभूषण स्तूपमध्ये किंवा मुक्तीभूमीच्या इमारतीमध्ये चप्पल घातलेली नव्हती.मुक्तीभूमीच्या पायऱ्यांवर चप्पल घातलेली होती. मात्र पराचा कावळा करण्यात आला आहे
समिरभाऊ यांनी मुक्तिभूमिला भेट देऊन १३ ऑक्टोबर च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला व सर्व यंत्रणांना कामाला लावले.

खरे तर महाराष्ट्र राज्यातील दीक्षाभूमीनागपुर आणि चैत्यभूमी दादर मुंबई याप्रमाणेच येवला येथिल मुक्तिभुमिला देखील तेवढेच महत्व आहे. कित्येक वर्षापासून मुक्तिभूमी विकासाचा प्रश्न भुजबळ साहेबांमुळे मार्गी लागला.आजही त्याचे या भूमीच्या विकासा बाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. त्यांचे हे योगदान आंबेडकरी जनता कदापि विसरू शकत नाही.म्हणूनच क्षुल्लक बाबी वरून पराचा कावळा करून जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही ठराविक लोकांकडून केला जात आहे.ज्यांची आंबेडकरी विचारांवर निष्ठा आहेते कधीही या थातुर-मातुर भूलथापांना भिक घालणार नाही.

मुक्तीभूमी परिसरामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा,विश्वभूषण स्तूप,विपश्यना हॉल,पाली व संस्कृत अभ्यास केंद्र,सुसज्ज ग्रंथालय ऑडिओ विज्वल रूम, आर्ट गॅलरी भिक्खू निवास केंद्र,मीटिंग हॉल,भिकू पाठशाळा,कर्मचारी निवासस्थान,डायनिंग हॉल असे अनेक सुविधा या उपलब्ध करून देण्यात आले आहे. मला या ठिकाणी एकच सांगायचे आहे की संपूर्ण येवल्यातील आंबेडकरी समाज हा भुजबळांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मात्र काही लोकांकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा षडयंत्र राखले जात आहे या षडयंत्राला आम्ही बळी पडणारे नाही.

मात्र ज्यांच्या डोक्यात कांदे, बटाटे भरलेले आहेत तेच असे उद्योग करतात.आंबेडकरी समाजासाठी भुजबळांनी दिलेले योगदान आम्ही विसरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here