Home महाराष्ट्र जिंतूर तालुक्यात तालुकास्तरीय विषय मित्र अध्यापन कौशल्य स्पर्धा संपन्न

जिंतूर तालुक्यात तालुकास्तरीय विषय मित्र अध्यापन कौशल्य स्पर्धा संपन्न

160

 

 

(प्रतिनिधी-सौ.अश्विनी जोशी)

जिंतूर- तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विषय मित्र अध्यापन कौशल्य स्पर्धेचे आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर येथे करण्यात आले. आयोजित केलेल्या भव्य तालुकास्तरीय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले म्हणाले की, विषय मित्र अध्यापन कौशल्य स्पर्धा गुणवत्ता वाढीसाठी पोषक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला वाव देणारी ही स्पर्धा आहे. गुणवत्ता विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारा तालुका म्हणून जिंतूर तालुक्याची संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. या आगळ्या-वेगळ्यास्पर्धेचे राज्यात पहिल्यांदा आयोजन केल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात जिंतूर तालुक्याची विशेष दखल घेतली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. विद्यार्थी केंद्रित ज्ञानरचनावादी अध्ययन अनुभवाची योजना करणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य बनले आहे. भविष्यवेधी शिक्षणाकडे वाटचाल करताना व अध्ययन प्रक्रियेचे प्रभावी व्यवस्थापन करत असताना स्वयंअध्ययन, सहअध्यायी अध्ययन व गटकार्याद्वारे अध्ययन या संकल्पनांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये विषय मित्र विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. वर्ग स्तरावर आपल्या शाळेमध्ये अनेक विषय मित्र प्रभावी काम करत आहेत. या सर्व विषय मित्रांच्या अध्यापन कौशल्याला वाव देण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धा प्रमुख व परीक्षक यांनी सर्व नियम, प्रक्रिया व निकष ठरवून शिस्तबद्ध पद्धतीने सुंदर आयोजन केलेले आहे. याबाबत सर्व सूचना व स्पर्धेची संपूर्ण प्रक्रिया अवगत केलेली आहे. संपूर्ण स्पर्धेचे सुंदर आयोजन नियोजन केल्याचे बघून आनंद वाटत आहे.

स्पर्धा आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. साबळे, मंगेश नरवाडे, केंद्रप्रमुख मारुती घुगे, पांडुरंग भाबळे, दिनकर घुगे, संजय स्वामी, अनिल स्वामी, माधव गडदे, सचिन हजारे, लक्ष्मीकांत नाईक, पानबुडे, सुभाष रोडगे, श्रीमती योगिता संगवई, श्रीम. रत्नमाला तोडकर, वैजनाथ प्रधान, प्रभाकर नालंदे, सचिन चव्हाण, भास्कर मुंडे, सुनील फड, श्रीमती सुनिता मगर, संजय माहोरे, यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, सर्व उच्च श्रेणी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

या भव्य तालुकास्तरीय स्पर्धांचे सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले. या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर, वडाळी, संक्राळा, कोरवाडी, जांब बु, वरुड नृ येथील विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here