Home महाराष्ट्र फुले एज्युकेशन तर्फे सांगली मध्ये विजयादशमी दिनी उच्चशिक्षीत शिंदे आणि हंकारे यांचा...

फुले एज्युकेशन तर्फे सांगली मध्ये विजयादशमी दिनी उच्चशिक्षीत शिंदे आणि हंकारे यांचा सत्यशोधक साखरपुडा सोहळा संपन्न

165

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : – फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाऊंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्र पुणे चे वतीने सांगली येथे दांडेकर हॉल, विश्रामबाग येथे उच्चशिक्षित आर्किटेक्ट सत्यशोधक देवेंद्र बाबासाहेब शिंदे आणि कॉम्पुटर इंजीनिअर सत्यशोधिका भाग्यश्री राजाराम हंकारे यांचा दि.12.10.2024 रोजी( विजया दशमी दिनी) दुपारी 12 वाजता अगोदर सुपारी फोडण्यात आली .दोन्ही परिवाराचे संमतीने याच कार्यक्रमात सत्यशोधक पद्धतीने संस्थेचे वतीने पहिला साखरपुडा सोहळा महात्मा फुले चरित्र साधने साहित्य प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी विधीकार्य पार पाडले. यावेळी देवेंद्र आणि भाग्यश्री यांचेकडून आई वडील, व समाजाची,दीन दुबळ्यांची सेवा करणार अशी शपथ घेतली.त्यानंतर हे सत्यशोधक कार्य निश्चित करून पार पाडले म्हणून श्रीमती.शांता हंकारे आणि सौ.संगीता व बाबासाहेब शिंदे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मान पत्र सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता , पाटबंधारे ऍड.गणपतराव शिंदे यांचे शुभहस्ते देण्यात आले.आणि फुले एज्युकेशनचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी वधू वर यांना थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम भेट देण्यात आली.
याप्रसंगी नगरसेविका व माजी सभापती श्वेता वाघमारे, माजी सभापती शोभा शिंदे, भारत मुक्ती मोर्चाचे सुजाता पवार आणि राष्ट्रीय मुलनिवासी ,महिला संघ अध्यक्षा नंदा कांबळे यांनी म्हंटले की सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा सोहळा या परिसरात प्रथम होत आहे यापुढे आपण सर्वांनी महापूर्षांचे विचाराने सर्व विधी कार्य केले पाहिजेत,सोबत जुन्या काही चांगल्या प्रथा देखील चालू ठेवल्या पाहिजेत..तसेच आपल्या सत्यशोधक कार्याचा प्रसार करण्यासाठी हंकारे, शिंदे परीवारासारखे सर्वांनी पुढे यावे असे देखील आवाहन करण्यात आले. सत्यशोधक ढोक म्हणाले की आज आपला दसरा सन महत्वाचा असताना देखील सर्व आप्तेष्ट या कार्यासाठी आवर्जून उपस्थीत पाहून या सत्यशोधक समाजाचे प्रबोधन करण्यासाठी तसेच याच वधू वर यांचे 26 नोव्हेंबर 24 रोजी संविधान दिनानिमित्त सत्यशोधक विवाह लावण्यासाठी बोलवत आहात हे आमचे संस्थेचे भाग्य समजतो.हा विवाह सोहळा 49 वा मोफत पार पडणार असल्याचे देखील ढोक म्हणाले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला वधू वर यांचे शुभहस्ते फुले दाम्पत्य यांचे अर्धपुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला तर आई वडिलांचे हस्ते राष्ट्रीय संत रोहिदास यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आला तसेच सर्व ग्रंथांचे पूजन करण्यात आले.यावेळी करमणूक म्हणून सौ.रंजना कुऱ्हाडे व इतर महिलांनी मराठी,हिंदी सिनेमा गीते सादर केले तर जेष्ठ समाजसेवक बजरंग हंकारे यांनी सर्वांचे आभार मानले आणि सौ.सुप्रिया व हृदयेश कुऱ्हाडे यांनी मौलिक मदत केली.याप्रसंगी सर्वांना पान सुपारी ,स्नेहभोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here