(पद्माकर घुरंधर, खामगाव प्रतिनिधी )
खामगांव -2024 च्या विधानसभेची निवडणूक आचारसंहिता 14 ऑक्टोंबर किंवा 15 ऑक्टोंबर 2024 रोजी लागण्याची दाट शक्यता आहे. परंतू निविदा प्रकिया पुर्ण झालेली नसतांना वैशिष्टयपुर्ण योजने अंतर्गत खामगाव नगर परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भुमिपूजन आकाश फुंडकर यांनी दि.11 ऑक्टोंबर 2024 प्रभाग नं.15 मध्ये, प्रभाग नं.10 मध्ये,प्रभाग नं.4 मध्ये विकासकामांचे भुमिपुजन केले. या भुमिपुजनाशी संबंधीत यंत्रणा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता यांचेशी उपरोक्त कामाची माहिती घेतली असता या कामाची निवीदा प्रक्रिया पुर्ण झालेली नाही व कंत्राटदार देखील निश्चीत झालेला नाही. म्हणूनच या भुमिपुजन कार्यक्रमाशी आमचा काहीही संबंध नाही असे सांगितले.
टोल सम्राट यांनी प्रभाग नं.15 , प्रभाग नं.10 मध्ये,प्रभाग नं.4 च्या नागरीकांची व समाज बांधवांची दिशाभूल करुन केवळ प्रसिध्दी पिसाट जनप्रतिनिधीने जनतेची दिशाभूल करुन टोल सम्राटाने केवीलवाणा प्रयत्न केला असुन सत्तेचा दुरुपयोग केला आहे. संबंधीत प्रभागातील जनतेने ज्या-ज्या ठिकाणी भुमिपुजनाचा समारंभ झाला त्या ठिकाणाच्या विकास कामांचा कार्यारंभ आदेश व संबंधीत ठेकेदाराचे नाव आमदारांना विचारावे. यावरुनच खर कोण बोलतो व खोट कोणं बोलतो हे सिध्द होईल. कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न होता सत्तेच्या मस्तीत बेकायदेशीर भुमिपुजन करणे ही बाब निषेधार्य आहे असे सानंदा यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.