सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०
चिमूर – राज्यांतील विधानसभा निवडणुकाचा आता काही दिवसात बिगुल वाजणार असल्याने, चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस, भाजपा व्यतिरिक्त तिसरी आघाडी सुद्धा नवा चेहरा घेवून मैदानात उतरणार आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपा तर्फे आमदार बंटी भांगडिया तर काँग्रेस पार्टी तर्फे डॉ. सतीश वारजूकर व धनराज मुंगले हे उमेदवारी दावेदारी करीत आहेत. मात्र यात कोणाच्या पदरात काँग्रेस पक्षाची उमेदवारी पडते हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर या भाजपा काँग्रेस व्यतिरिक्त वंचीत बहुजन आघाडीच्या तिसरी आघाडी रूपाने नवा चेहरा म्हणुन अशोक रामटेके हे साम, दाम, दंड नीती घेऊन चिमूर विधानसभा क्षेत्रातील मैदानात उतरणार असल्याची दाट शक्यता आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजपा व काँग्रेससाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपा तर्फे आमदार बंटी भांगडिया आपल्या विधानसभा क्षेत्रात चौफेर विकास करून मतदार संघांतील प्रत्येक नागरीकांच्या एका हाकेला धावून जात असून, तेली समाज, माना समाज यांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचे सभागृह सर्व सोयी सुविधायुक्त उपलब्ध करून दिले तर प्रत्येक दिवशी आपल्या क्षेत्रांत लक्ष ठेवून गोर गरीबांच्या एका हाकेला धावून जात मदत करत असतात. तर शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यासाठी लढा देत असतात असे दावे त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.
काँग्रेस तर्फे डॉ. सतीश वारजुकर व ओबीसी नेते धनराज मुंगले हे दावेदारी करीत असून, दोघांकडून पण उमेदवारी आपल्यालाच मिळणार अशी बतावणी केली जात आहे. त्यामुळं चिमूर विधानसभा क्षेत्रात दोघांकडून पण मतदारसंघात प्रत्येक गावागावात जाऊन भेटीगाठी घेत कुठे आर्थिक मदत तर कुठे शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम करीत आहेत. चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे दोन जनसंपर्क कार्यालय सुद्धा सूरु करण्यात आले असून मतदारांचे सोडा मात्र कार्यकर्त्यात संभ्रम सुरु असून, कधी डॉ. सतीश वारजूकर सोबत तर कधी धनराज मुंगले यांच्या सोबत दिसून येतात. त्यामुळं सध्या मतदार सुद्धा पेचात पडले आहेत. या व्यतिरिक्त नविन चेहरा शोधत आहेत. त्यामुळं तिसरी आघाडी म्हणुन ब्रम्हपुरी येथील अशोक रामटेकेच्या रूपाने चिमूर विधानसभा क्षेत्रात मैदानात उतरणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
अशोक रामटेके हे ब्रम्हपुरी येथे नगरसेवक म्हणुन ब्रम्हपुरीचा कारभार पाहत होते. त्यामुळं त्यांना राजकीय क्षेत्रातला चांगला दांडगा अनुभव असून, चिमूर विधानसभा क्षेत्रात त्यांची ओळख सुद्धा आहे. आता नवा चेहरा म्हणुन मतदार त्यांचेकडे पहात असून, अशोक रामटेके यांना जर वंचीत बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी मिळाली तर माना समाजाचे नेते माजी राज्यमंत्री डॉ रमेश गजभे व अरविंद सांदेकर यांची भूमिका महत्वाची राहणार आहे, अशोक रामटेके हे अनुसूचित जाती चे असल्याने अनुसुचित जातीच्या समाजाचे मत सुद्धा अशोक रामटेके यांच्या माध्यमातून वंचीत बहुजन आघाडीला मिळतील अशी चर्चा सुज्ञान नागरिक करीत आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदार संघात जनतेने कमी प्रतिसाद दिला, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ R S S आमदार भांगडिया यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल नसल्याचे बोलल्या जात आहे, त्यामुळे भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजप जेष्ठ नेते वसंत वारजूकर प्रयत्न करीत असल्याची गोपनीय चर्चा सुरु आहे.
कांग्रेस ची उमेदवारी डाँ सतीश वारजूकर व धनराज मुंगले यांच्यापैकी कुणाला मिळणार हे आजतरी स्पष्ट सांगणे कठीण आहे. या दोघांच्या वादात नवीन नाव पुढे आले तर आश्चर्य वाटू नये, यात शिवानी वडेट्टीवार किंवा पंजाबराव गावंडे हे नाव पुढे करण्याची रणनीती वरिष्ठ पातळीवर सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.
माजी राज्यमंत्री डाँ रमेश गजभे यांनी आपली भूमिका अजूनपर्यंत जाहीर केली नसली तरी वंचित बहुजन आघाडीचा एक गट त्यांनी उमेदवारी घ्यावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे कांग्रेस मधील सध्या सुरु असलेला उमेदवारी गोंधळ लक्षात घेऊन डाँ गजभे यांनी कांग्रेस कडे प्रयत्न करावेत असा एक मतप्रवाह त्यांच्या कार्यकर्त्यात सुरु आहे, कांग्रेसची उमेदवारी गजभे यांना मिळणार असे कुणी आज सांगितले तर राजकीय अज्ञान असल्याचे उत्तम उदाहरण होऊ शकते, मात्र कांग्रेस मध्ये काहीही होऊ शकते हे कुणीही नाकारू शकत नाही.
चिमूर विधानसभा मतदार संघात नागभीड व चिमूर तालुक्याचा समवेत असला तरी प्रत्येक वेळेस मोठे राजकीय पक्ष हे नागभीड कडे दुर्लक्ष करीत असतात, त्यामुळे कांग्रेसची उमेदवारी पंजाबराव गावंडे यांनाच मिळावी म्हणून युक्तिवाद केल्या जात आहे, गावंडे यांना कांग्रेस पुढे केल्यास नागभीड तालुक्यातील बहुतेक सर्वच राजकीय पक्ष त्यांना पडद्याआडून सहकार्य करतील असा चर्चेचा सूर आहे.