Home यवतमाळ कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्याकरिता नागरिकांचा सहभाग आवश्यक – शंकर पांचाळ ठाणेदार

कायदा, सुव्यवस्था व शांतता राखण्याकरिता नागरिकांचा सहभाग आवश्यक – शंकर पांचाळ ठाणेदार

52

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ६ ऑक्टोबर)
पोलीस स्टेशन उमरखेड येथे पुनर्नियुक्ती होऊन आलेले ठाणेदार शंकर पांचाळ यांनी रुजू होताच आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाणेदार शंकर पांचाळ यांनी या अगोदर उमरखेड येथे सेवेत असताना कर्तव्यदक्षपणे आपली सेवा बजावली त्यांची बदली मारेगाव येथे झाली त्यानंतर उमरखेड नगरीतील त्यांचा कार्यानुभव बघता पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी त्यांची पुनर्नियुक्ती उमरखेड येथे केली.

पत्रकारांशी संवाद साधताना खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी विविध विषय हाताळत कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा त्याचप्रमाणे राजकीय पुढारी, समाजसेवक तसेच सामाजिक संघटना, पत्रकार बांधव एकूणच प्रत्येक घटकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करून समोर असणारे दसरा दिवाळी यासारखे विविध सण उत्सव आपापल्या पारंपारिक पद्धतीने कसे साजरी करता येतील यावर भर देऊन हे सण उत्सव तसेच आगामी विधानसभा निवडणूक निर्भयपणे खेळीमेळीचे वातावरणात वरिष्ठांचे मार्गदर्शनात पार पाडण्याकरता पोलीस विभाग प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली त्या अनुषंगाने सर्व जाती धर्माच्या लोकांना,पुढार्‍यांना व सामाजिक संघटनांना कोणत्याही जातीय तेड निर्माण न होण्याच्या अनुषंगाने सहकार्य करावे तसेच उमरखेड शहरातील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व दैनंदिन पोलीस स्टेशनला येणाऱ्या तक्राराची योग्य दखल घेऊन व तसेच शाळा कॉलेज या ठिकाणी पेट्रोलिंग करून चिडी मारी करणाऱ्याच्या मुस्क्या आवळयात येतील व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी व माझे सहकारी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अनेक पत्रकार बंधूंनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here