Home महाराष्ट्र परभणी शहरात पत्रकारांना 500 निवासी सकुंल देण्याचे वचन. आ.डॉ.राहुल पाटील

परभणी शहरात पत्रकारांना 500 निवासी सकुंल देण्याचे वचन. आ.डॉ.राहुल पाटील

249

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :- परभणी येथे आर. पी. मेडिकल कॉलेज व व्हाॅईस आँफ मिडियाच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटूंबाचे आरोग्य तपासणी शिबीर वआरोग्य कार्ड वाटप करण्यात आले.

पत्रकार हा नेहमी धावपाळ करुन बातमी घेत असतो कुठला ही कार्यक्रम असो सर्व प्रथम पत्रकार उपस्थित असतात, तसेच समाजातील काय घडामोडी होत असतात यांची माहिती पत्रकारांमुळे माहिती मिळते. आशा या धावपाळीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्या कडे लक्ष देण्याची काळाची गरज आहे. पत्रकारांसाठी एक वेगळे आर्थिक महामंडलाची न मागणी महाविकास आघाडी व शिवसेना प्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या कडे करणार असून, आगामी विधानसभेत महाविकास आघाडीची सरकार आल्यास परभणी शहरात पत्रकारांना 500 निवासी सकुंल देण्याचे वचन या आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात आ.डाॅ.राहुल पाटील यांनी व्यक्त केले.

या वेळी आर.पी. मेडिकल काॅलेज व व्हाॅईस आँफ मिडियाच्या यांच्या वतीने रविवार 6 आँक्टोंबर रोजी आमदार डाॅ.राहुल पाटील यांच्या हस्ते पत्रकार बांधावांना मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येऊन आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले.

सकाळी आठ वाजल्या पासुन पत्रकारांची विविध आरोग्य तपासणीला प्रारंभ झाले असुन या तपासणी जवळपास दोनशेच्यावर पत्रकारांनी आरोग्य तपासणी आणि यात पत्रकाराच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी केली. तसेच दुपारी एक वाजता सर्व पत्रकारांना आरोग्य कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी व्हाईस आँफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी आपले परखड मत व्यक्त करत म्हणाले कि, लडकी बहिणी पेक्षा पत्रकाराची परिस्थिती वाईट आहे. तसेच पत्रकार हा लोकशाईचा चौथा स्तंभ आहे असे म्हणतात परंतु चौथा स्तंभचा जन्म हा अमवशाच्या दिवशी झाला असवा असे वाटते, कारण की पत्रकार यांची अर्थिक परिस्थिती बिकिट असून यांना अर्थीक परिस्थिती सुधरण्याची आवश्यकता आहे. या साठी पत्रकारा साठी एक महामंडळ ची मागणी आहे. परंतु या सरकारने मागेल त्याला महामंडळ दिले परंतु पत्रकारांसाठी महामंडळ दिले नाही असी खंत व्यक्त केली.

या कार्यक्रमास उपस्थित व्हाईस आँफ मिडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के डिन प्रमोद शिंदे, विद्यापीठाचे डिन उदय घोडके, डाॅ.विवेक नांवदर, प्रंशात ठाकुर, गजानन काकडे, व्हाईस आँफ मिडियाचे मराठावाडा उपाध्यक्ष विशाल माने, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिंतुरचे विजय चोरडिया, कैलास चव्हाण,पाचपोर आदी मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य तपासणी शिबीराला परभणी जिल्हयातुन पत्रकार उपस्थित होते. या करीता आरपी मेडिकल काॅलेज व व्हाॅईस आँफ मिडियाचे पदाधिकारी, पत्रकार व सदस्य परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here