Home महाराष्ट्र शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व उर्वरित जिल्हा आंतर...

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघांचा सहभाग

41

 

 

*जळगाव दि. ७ प्रतिनिधी -* क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सहआयोजीत “उर्वरित जिल्हा आंतर शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०२४-२५” अनुभूती निवासी स्कूल येथे दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान पार पडल्यात. स्पर्धेत जिल्ह्यातील ५० संघाचे २५० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्षे वयोगटात उर्वरित जिल्ह्यातून अनुभूती निवासी स्कूल, जळगाव व पोदार इंटरनेशनल स्कूल चाळीसगाव या शाळांचे वर्चस्व दिसून आले. अनुभती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा शिक्षक अमोल पाटील, विजय संकत यांच्या हस्ते झाले. क्रीडा अधिकारी डॉ. सुरेश थरकुडे, प्रशात जाधव, विवेक अहिरे, दर्शन गवळी हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित सुवर्ण, रजत आणि कास्य पदक प्रदान करण्यात आले.

विजेता खेळाडूंचे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी, जैन स्पोर्ट्स अकॅडेमीचे अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कौतूक केले. विजयी संघातील खेळाडूंचे या स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून किशोर सिंह, सुरेश थरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपीका ठाकूर, शुभम पाटील, पूनम ठाकूर, कोनिका पाटील, ओम अमृतकर, ओवी पाटील, जयेश पवार, देवेंद्र अहिरे, श्र्लोक जगताप यांनी काम पाहिले.किशोर सिंह सिसोदिया यांनी सूत्रसंचालन केले. दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

*बॅडमिंटन स्पर्धेचा निकाल* – मुलांच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), जळगावचे काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल (द्वितीय), भुसावळची ताप्ती पब्लिक स्कूल (तृतीय),
मुलींच्या १४ वर्ष वयोगटात पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (प्रथम), सेंट मेरी इंग्लिश मिडीयम स्कूल, अमळनेर (द्वितीय), किड्स गुरुकुल इंटरनेशनल स्कूल (तृतीय)
मुलांच्या १७ वर्ष वयोटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), पोदार इंटरनेशनल स्कूल, चाळीसगाव (द्वितीय), डॉ. उल्हासराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, भुसावळ (तृतीय),
मुलींच्या १७ वर्ष वयोटात तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ (तृतीय),
मुलांच्या १९ वर्षे वयोगटात प्रताप कॉलेज, अमळनेर (प्रथम), अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (व्दितीय), नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल ता. रावेर (तृतीय),
मुलींच्या १९ वर्षे वयोगटात अनुभूती निवासी स्कूल, शिरसोली ता. जळगाव (प्रथम), प्रताप कॉलेज, अमळनेर (द्वितीय), ए. सी. एस. कॉलेज, धरणगाव (तृतीय) विजयी झालेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here