Home विदर्भ गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण

गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण

174

भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषणासाठी बसले आहेत. प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने राज्यपाल भंडारा आले असताना निवेदन देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत अवगत केले होते.
प्रकल्पग्रस्त बाधितांच्या प्रमुख मागण्यांमध्ये गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त नोकरी करिता प्रमाणपत्र देण्यात आले ते 2022 2023 पासून रद्द करण्यात आले ते पूर्ववत करण्याबाबत. वाढीव कुटुंबाला दोन लाख 90 हजार रुपये देण्यात यावे .गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त भूमिहीनांना कमीत कमी एक एकर शेत जमीन देण्यात यावी. प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे. तिसऱ्या टप्प्यातील उर्वरित गावाचे पुरामुळे नुकसान होत असल्याने तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. 75 टक्के शेतजमीन गेलेली आहे अशा गावांचे व बावीस गावांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे, सचिव शेषराज रामटेके, अतुल राघोर्ते ,सुनील भोपे,प्रमिला शहारे, मंगेश पडोळे,कमलेश सुखदेवे,बाळू ठवकर,पुरुषोत्तम गायधने,मयुरी सुखदेवे, दिनेश राघोर्ते यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here