Home महाराष्ट्र गंगाखेडच्या जनाई फेस्टिवल मध्ये लाडक्या बहिणींनी अभिनेत्री उर्मिला सोबत धरला ठेका!

गंगाखेडच्या जनाई फेस्टिवल मध्ये लाडक्या बहिणींनी अभिनेत्री उर्मिला सोबत धरला ठेका!

361

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड :-शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून आयोजित महोत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री दुनियादारी फेम उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या सोबत शहरासह ग्रामीण भागातील महिला भगिनींनी गरबा डान्स करून मनमुराद आनंद घेतला. त्यामुळे गंगाखेडच्या लाडक्या बहिणींनी अभिनेत्री उर्मिला सोबत धरला ठेका! हे अतिशय देखणे चित्र पाहायला मिळाले.
शहरातील टीएम सावंत मैदान येथे मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जनाई फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिने हजेरी लावून उपस्थित महिलांना प्रोत्साहन दिले. तसेच प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक केले. शेवटी, स्थानिक आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या कामगिरीचा आढावा मांडून पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन केले.
दिनांक ३ ते १२ ऑक्टोबर या दरम्यान या जनाई नवरात्र फेस्टिवलचे अतिशय देखणे व सुंदर आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन व इतरही उपक्रम राबविले जात आहेत. तसेच उपस्थित महिला भगिनींसाठी मोफत काही आकर्षक वस्तू उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दररोज वेगवेगळ्या पदार्थांची सुध्दा मेजवानी ठेवण्यात आली आहे.
या फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवसाचे औचित्य साधून उपस्थित महिला भगिनींसाठी आईस्क्रीम, ३६० फोटो बुथ, इन्स्टा फोटो बुथ, मेहंदी, नेल आर्ट, टॅटू याचाही लाभ मोफत उपलब्ध करून देण्यात आला होता. सर्वत्र महिलांची गर्दी, डान्स, रोषणाई, विविध गाणी, संगीताचा लयबध्द नाद, बिग हनुमान या सगळ्यांमुळे वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. वेळी यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष तसेच मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, शहरासह तालुक्यातील माता-भगिनी, नागरिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here