✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. ४ ऑक्टोंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात ध्यान साधना शिबिराचे आयोजन शुक्रवारी ( दि.४) करण्यात आले.
याप्रसंगी पुण्याच्या तेजज्ञान फाउंडेशन हॅपी थॉटसच्या उमरखेड शाखेचे स्वयंसेवक गोविंद चनेबोईनवाड, मनीषजी भट्टड, दादाराव कोल्हे, दत्तराव उगले, सौ. रेणुका चनेबोईनवाड यांनी शिबिरात ध्यानसाधनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. उपस्थित विद्यार्थ्यांकडून ध्यानसाधना करून घेतली. ध्वनी चित्र फितीच्यामाध्यमातून विद्यार्थ्यांना ध्यानसाधना कशी करावी, हे शिकविले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बा. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान साधनेसाठी सर्व शिक्षक व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा.अभय जोशी, प्रा.प्रवीण नखाते, प्रा.डॉ. नवीन जांभेकर, प्रा. डॉ. प्रवीण सरपाते, प्रा. डॉ. आर. जे. डहाके व प्रा.आर. ए. तेला व प्रा. बाळकृष्ण राठोड यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.