ब्रम्हपुरी :- स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्निग्धा कांबळे यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर डॉ.स्निग्धा कांबळे व प्रा.सरोज शिंगाडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे देशासाठीचे योगदान सांगून प्रत्येक नागरिकांनी विद्यार्थ्यानी आपापले परिसर स्वच्छ ठेवल्यास आपण सुदृढ राहू.असे मार्गदर्शन केले.त्यानंतर एन सी सी विभाग प्रमुख लेप्ट.सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी गर्ल्स युनिट तर्फे महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच एन सी सी गर्ल्स कॅडेट उपस्थित होते.